Download App

ठरलं! iPhone 16 ‘या’ दिवशी लाँच होणार, जाणून घ्या ॲपल इव्हेंटमध्ये आणखी काय असणार खास?

iPhone 16 : येत्या काही दिवसात सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. जगातील सर्वात लोकप्रिय मोबाईल कंपनी ॲपल सप्टेंबर महिन्यात iPhone सीरिजसाठी

  • Written By: Last Updated:

iPhone 16 : येत्या काही दिवसात सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. जगातील सर्वात लोकप्रिय मोबाईल कंपनी ॲपल सप्टेंबर महिन्यात iPhone सीरिजसाठी ॲपल इव्हेंट आयोजित करत असते. माहितीनुसार ॲपलच्या या इव्हेंटमध्ये बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित iPhone 16 सीरिज लाँच होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ॲपल इव्हेंट 10 सप्टेंबर 2024 रोजी होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार, इव्हेंटमध्ये नवीन आयफोन मॉडेल्ससह ऍपल वॉच, एअरपॉड्स 4 आणि एअरपॉड्स मॅक्स लाँच होण्याची शक्यता आहे.

iPhone 16 आणि iPhone 16 Pro

iPhone 16 सिरीजमध्ये काही किरकोळ बदलांसह आयफोन 15 मॉडेल्सप्रमाणेच डिझाइन असणार आहे. iPhone 16 मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी नवीन कॅप्चर बटणासह ॲक्शन बटण यावेळी कंपनीकडून देण्यात येणार आहे. या सिरीजमध्ये सर्व फोन अपग्रेड केलेल्या A18 चिपद्वारे समर्थित असणार आहे. तर iPhone 16 Pro मॉडेलमध्ये स्क्रीन साईज देखील वाढवण्यात येणार आहे. माहितीनुसार, कंपनी iPhone 16 Pro मध्ये 6.3 इंच डिस्प्ले देणार आहे तर iPhone 16 Pro Max मध्ये 6.9 इंच डिस्प्ले मिळणार आहे.

Apple Watch

या इव्हेंटमध्ये कंपनीकडून Apple Watch सीरिज 10 लाँच करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वॉचमध्ये एक नवीन चुंबकीय बँड सिस्टिम सादर करण्यात येऊ शकते.

AirPods 4

कंपनीकडून या इव्हेंटमध्ये AirPods 4 देखील लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनी AirPods 4 चे दोन मॉडेल लाँच करू शकते. यात एक ऍक्टिव्ह नॉइज कैंसलेशनसह तर दुसरा त्याशिवाय लाँच करण्यात येणार आहे. AirPods 4 मध्ये एक लहान स्टेम आणि USB-C चार्जिंग केस असलेले नवीन डिझाइन असेल ज्यामध्ये Find My Alerts साठी स्पीकर्स समाविष्ट असतील.

आयटी अन् मॅकेनिकल इंजिनिअर, UPSC ही केली क्रॅक.. भारताचे क्रिकेटर्स शिक्षणातही अव्वल

AirPods Max

तसेच या इव्हेंटमध्ये AirPods Max रिफ्रेश करण्यात येणार असल्याची चर्चा देखील जोरात सुरु आहे. मात्र AirPods Max मध्ये किरकोळ बदल करण्यात येणार आहे. माहितीनुसार, कंपनी USB-C पोर्टसाठी लाइटनिंग पोर्ट स्वॅप करण्याचा विचार करत आहे. तसेच आणखी एक नवीन कलर व्हेरियंट सादर करण्यात येणार असल्याची देखील चर्चा आहे.

follow us