Kia EV9 : भारतीय बाजारपेठेमध्ये आज मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) मागणी वाढत आहे. त्यामुळे भारतीय बाजारात आज एकापेक्षा एक जबरदस्त इलेक्ट्रिक कार्स लाँच होत आहे. यातच Kia देखील भारतीय बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी करत आहे.
माहितीनुसार, भारतीय बाजारात Kia आपली नवीन इलेक्ट्रिक कार Kia EV9 लाँच करणार आहे. या कारमध्ये कंपनी उत्तम रेंजसह भन्नाट फीचर्स देखील देणार आहे. माहितीनुसार भारतीय बाजारात ही कार पुढील महिन्यात म्हणजे 03 ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहे. कंपनीकडून Kia EV9 बरोबरच कंपनी Kia Carnival देखील लाँच करणार आहे. या कारमध्ये देखील जबरदस्त फीचर्स मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Kia EV9 रेंज
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Kia EV9 मध्ये जबरदस्त फिचर मिळणार आहे. या कारमध्ये 99.8 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात येणार आहे. ही कार फास्ट चार्जरने 24 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तसेच ही कार सिंगल चार्जमध्ये 561 किमीची रेंज देणार आहे. ही कार भारतीय बाजारात ऑल व्हील ड्राइव्ह टेकनॉलॉजीसह लाँच होणार आहे.
Kia EV9 फीचर्स
Kia EV9 मध्ये बॉडी कलरचे फ्लश डोअर हँडल असणार आहे. याच बरोबर या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये एसडीआरएल, डिजिटल पॅटर्न लाइटिंग ग्रिल, आयएलईडी, डायनॅमिक वेलकम फंक्शन, गनमेटल पेंट एक्सेंट, स्पोर्टी स्किड प्लेट, रेन सेन्सिंग वायपर्स, एलईडी एचएमएसएल विथ रिअर स्पॉयलर, एलईडी रिअर फॉग लॅम्प, हिडन रिअर वायपर, 30 इंच अलॉय व्हील्स देखील पाहायला मिळणार आहे.
तसेच या कारमध्ये ड्युअल टोन लेदर सीट्स, ॲम्बियंट लाइट्स, ड्युअल सनरूफ, स्पोर्टी ॲलॉय पॅडल्स, ड्राईव्ह मोड आणि टेरेन मोड, रिजनरेटिव्ह सिस्टम, सेकंड रो मसाज सीट्स, हीटेड आणि वेंटिलेटिड सीट्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, पॉवर्ड चाइल्ड सेफ्टी लॉक, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हेड-अप डिस्प्ले, सिक्स टाइप सी यूएसबी पोर्ट, किआ कनेक्ट, 12.3-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पाच-इंच HVAC कंट्रोल डिस्प्ले सारखी फीचर्स मिळणार आहे.
काहीतरी मोठं घडणार, लेबनॉन लवकर सोडा, अमेरिकेसह ‘या’ देशांनी जारी केला अलर्ट
याचबरोबर 12.3-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, V2L, 14-स्पीकर ऑडिओ सिस्टम, 10 एअरबॅग्ज, ABS, ESC, DBC, MCB, BAS, VSM, ESS, पार्किंग सेन्सर, ऑल व्हील डिस्क ब्रेक, ADAS, 360 डिग्री कॅमेरा सारखी फीचर्स देखील कंपनीकडून देण्यात येणार आहे. माहितीनुसार, या इलेक्ट्रिक एसयूव्ही कारची किंमत 80 लाखांपर्यंत असून शकते मात्र याबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती कंपनीकडून शेअर करण्यात आलेली नाही.