रस्त्यावरून ये जा करणाऱ्या अवजड वाहनांच्या मागील बाजूला शेरो शायरी किंवा एखादे हटके वाक्य लिहिलेले आपण पाहतो. यातील काही वाक्ये मजेशीर असतात जी पटकन आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात तर काही वाक्ये अशीही असतात जी जीवनाचा खरा अर्थ सांगतात. पण एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे प्रत्येक ट्रकच्या मागे ‘हॉर्न ओके प्लीज’ हे वाक्य दिसतेच. ही ओळ तुम्हाला प्रत्येक ट्रकस, ट्रेलर आणि ट्रॉलीवर लिहीलेली आढळेल. हे तीन वाक्य इतके लोकप्रिय आहेत की त्यावर एक चित्रपटही येऊन गेला आहे.
आता ट्रकवर हे शब्द लिहीण्याचा काही अधिकृत नियम आहे का आणि त्याचा अर्थ काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आता या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या..
सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलाच्या किंमती 6 टक्क्यांनी घटणार…
तसे पाहिले तर, या वाक्याचा सरळ अर्थ असा होतो की पुढे जाण्याआधी हॉर्न वाजवा. ज्यामुळे ट्रकचालकाला ट्रकच्या आसपास दुसरेही वाहन आहे याचा अंदाज येईल. ट्रक हे मोठे वाहन असते. त्यामुळे काही वेळा चारही बाजूने येणारी वाहने दिसत नाहीत. हॉर्न वाजवल्याने वाहनाकडे लक्ष वळते आणि ट्रकचालकाला अंदाज येतो की आपल्या मागेपुढे वाहने आहेत.
आता हॉर्न प्लीज या शब्दांचा अर्थ तर कळला. मात्र या दोन शब्दांच्या मध्ये जे ओके शब्द आहेत ते कशासाठी वापरले असतील हा प्रश्न अजूनही कायम आहे. या ओके शब्दाचा अर्थ नुसताच ओके असा होत नाही. या शब्दांचा अर्थही काही खासच आहे. यामागे मोठा इतिहास आहे आणि त्याची दोन कारणेही आहेत.
AI आता तुमचे मनही वाचेल, मनातले विचारही लिहील, Texas मधील संशोधकांनी बनवले तंत्र
ओके शब्दाचा अर्थ काय ?
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जगभरात रॉकेलची टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी रॉकेल (केरोसीन) ट्रकमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जात होते. ट्रक केरोसीनने भरलेली असल्याने जर अपघात झाला तर आग लागण्याची दाट शक्यता होती. अशा परिस्थितीत इतर वाहनांना ट्रकमध्ये केरोसीन आहे हे सांगण्यासाठी ट्रकच्या मागील बाजूस ओके शब्द लिहीला जाऊ लागला. या शब्दाचा अर्थ होतो ‘ऑन केरोसीन’. तसे पाहिले तर आता या शब्दाचा उपयोग काहीच राहिलेला नाही. तरी देखील अवजड वाहनांच्या मागे अजूनही हा शब्द दिसतोच.