AI आता तुमचे मनही वाचेल, मनातले विचारही लिहील, Texas मधील संशोधकांनी बनवले तंत्र

AI आता तुमचे मनही वाचेल, मनातले विचारही लिहील, Texas मधील संशोधकांनी बनवले तंत्र

Now AI will also read human mind : सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजे, एआय किंवा कृत्रिम बुध्दीमत्तेचा बोलबाला आहे. एआय असलेले अनेक चॅटबॉट (Chatbot सध्या येत आहेत. थक्क करणारी काम करत आहेत. एनआयचे नवीन टुल चॅट जीपीटीमुळे मानवी जीवन खूप सुकर आणि सोपे होई, अशा विविध गोष्टी घडू लागल्या आहेत. त्यात 2023 हे वर्ष तर तंत्रज्ञानासाठी आणखी खास असणार आहे. विशेषता: आर्टिफइशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत.

एआय चॅटटूल सध्या खूप लोकप्रिय आहेत. एआय चॅटटूल (AI Chattool), चॅट जीपीटीने (Chat with GPT) चॅटटूल चा संपूर्ण नकाशा बदलला आहे. आता एआय आणखी एक पाऊन पुढे जात आहे. एआय आता तुमचे मनही वाचण्यास सक्षम आहे. एआय आता तुमचे मन रिएळ टाईममध्ये वाचू शकते. आणि ते शब्दात लिहू शकते.

ऑस्टिन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या (University of Texas at Austin) शास्त्रज्ञांच्या टीमने एआय मॉडेल विकसित केले आहे. जे तुमचे विचार वाचू शकते. सिमेंटिक डिकोडर म्हणून ओळखली जाणारी नॉन-इनवेसिव्ह एआय प्रणाली नेचर न्यूरोसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. अभ्यासानुसार, ते रिअल टाईममध्ये मेंदूच्या क्रियाकलापांचे वाचन आणि भाषांतर करू शकते.

Maharashtra Politics : नव्या सरकार स्थापनेचा मुहुर्त ठरला? सरोदेेच्या दाव्याने खळबळ

या अहवालाचे नेतृत्व जेरी तांग, संगणक विज्ञानातील डॉक्टरेट विद्यार्थी आणि युटी ऑस्टिन येथील न्यूरोसायन्स आणि संगणक विज्ञानाचे सहायक प्राध्यापक अॅलेक्स हथ यांनी केले. हा अभ्यास अंशता गुगल बार्ड आणि ओपन एआय आणि चॅट जीपीटी सारख्या ट्रान्सफॉर्मर मॉडेलवर आधारीत आहे.

हे एआय टूल पक्षाघात झालेल्या रुग्णांसाठी आणि अपंगासाठी वरदानापेक्षा कमी नाही. हे साधन एआय आधारीत डिकोडर आहे. जे मेंदूच्या क्रियाकलापांचा मागोवा घेते आणि एखादी व्यक्ती काय विचार करत आहे. किंवा त्याच्या मनात काय चालले आहे, याचा अंदाज लावते.

या संशोधनादरम्यान, तीन लोकांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. आणि त्यादरम्यान, त्यांना एक गोष्ट सांगितली गेली. संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, आता मेंदूचे रोपन न करता लोकांच्या मानसिक स्थितीची माहिती घेतली जाऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट ऐकते. किंवा एखाद्या गोष्टीची कल्पना करते, तेव्हा हे साधन त्याचे मजकुरात रुपांतर करण्यास सुरूवात करते. यासाठी लवकरच चॅटजीपीटी सारखे एय आय टूल विकसित केले जाईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube