VIDEO : दुबई एअर शोमध्ये मोठा विमान अपघात: उड्डाणावेळी लढाऊ तेजस विमान कोसळले

tejas aircraft : दुबईमध्ये एअर शो दजरम्यान मोठा विमान अपघात झाला आहे. भारताचे तेजस लष्करी विमान उड्डाणावेळी कोसळले आहे.

  • Written By: Published:
Indian Tejas Aircraft Crashes At Dubai Air Show

indian tejas aircraft crashes at dubai air show: दुबईमध्ये एअर शो दजरम्यान मोठा विमान अपघात झाला आहे. भारताचे तेजस लष्करी विमान उड्डाणावेळी कोसळले आहे.

दुबईमध्ये शुक्रवारी एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. या एअर शोमध्ये भारताचे तेजस लढाऊ विमान सहभागी झाले होते. हवाई प्रदर्शनासाठी विमानाने उड्डाण घेतले. त्यानंतर काहीच वेळात हे विमान जमिनीवर कोसळले आहे. दुपारी दोन वाजून दहा मिनिटाने ही दुर्घटना घडली आहे. या विमानाची निर्मिती एचएएल कंपनीने केलेली आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या व्यक्तींपासून दूर हे विमान पडले आहे. परंतु वैमानिकाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याबाबत भारतीय हवाई दलाकडूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

(बातमी अपडेट होत आहे)

follow us