Download App

पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! कृषी सेवक पदांची बंपर भरती, या तारखेपर्यंत करू शकता अर्ज

  • Written By: Last Updated:

Krushi sevak Recruitmnet : राज्य सरकारच्या कृषी आणि पदुम विभागांतर्गत पूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची भरपूर रिक्त पदे भरण्यात येणार होती. अखेर त्याला वाट मोकळी झाली आहे. आता सरळसेवेने कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र कृषी विभागाने कृषी सेवक (Krushi sevak) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रसिद्ध केली आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषी विभाग महाराष्ट्र भरती मंडळाने सप्टेंबर 2023 च्या जाहिरातीत एकूण 2070 रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. चला तर मग या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्त्वाच्या तारखांविषयी तपशीलवार नोटिफिकेशमध्ये दिली आहे. 14 सप्टेंबर पासून अर्ज करायला सुरूवात झाली आहे.

विभागाचे नाव – कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य.

पदाचे नाव – कृषी सेवक.

एकूण रिक्त पदे – 2070.

पदांचा तपशील-
लातूर – 170, पुणे – 188 पदे, औरंगाबाद – 196, अमरावती – 227, कोल्हापूर – 250, ठाणे – 255 नाशिक – 336 पदे, नागपूर – 448

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रात.

शैक्षणिक पात्रता:
कृषी पदविका, कृषी पदवी किंवा मान्यताप्राप्त सरकारी संस्था किंवा कृषी विद्यापीठातून समकक्ष.

अधिकृत वेबसाईट – https://krishi.maharashtra.gov.in/

INDIA : उमर अब्दुलांच्या फॉर्म्यूल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीत बिघाडी? महाराष्ट्रासह, बिहारचं समीकरण बिघडणार… 

वय श्रेणी –
सामान्य श्रेणी – 18 ते 40 वर्षे.
मागासवर्गीय – 18 ते 45 वर्षे.

अर्ज शुल्क –
खुली श्रेणी – रु 1000.
मागासवर्गीय- 900 रु.
वेतन – उमेदवारांना दरमहा 16 हजार रुपये पगार मिळेल.

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑक्टोबर 2023.

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1ZynXAim1Q8RY7k3W9yvS9Z83awRPO4cG/view

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यापूवी लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे:-
ऑनलाईन अर्ज करण्यापूवी उमेदवाराांनी खालील प्रमाणेआवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी इत्यादींचे / स्कॅन करून ठेवावे
छायाधचत्र (4.5 सेंX .मी. 3.5 सें .मी.)
स्वतःची स्वाक्षरी (काळ्या शाईने)
स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा (काळ्या किंवा निळ्या शाईच्या पाांढऱ्या कागदावर)

 

 

Tags

follow us