Download App

आजच थांबवा तुमच्या ‘या’ सवयी; नाहीतर आणखी वाढू शकते पोटाची चरबी

Health Update : आजकाल प्रत्येक जण शरीराच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. तर अनेक जणांना पोटाच्या वाढत्या चरबीची चिंता सतावते. तासन् तास जिममध्ये घाम गाळून आहे पोट कमी होण्याचे नाव घेत नाही. याच लठ्ठपणामुळे अनेक आजार आपला पाठलाग करतात. यावर उपाय म्हणून आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या काही सवयी बदलाव्या लागतील. पोटाची अतिरिक्त चरबी वाढविणाऱ्या सवयी कोणत्या आहेत त्याबद्दल जाणून घेऊ या..

पोटाची चरबी वाढण्याची कारणे 

1. खराब अन्न खाणे हे पोटाची चरबी वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. आपल्यापैकी अनेक जण जवळपास आठ ते दहा तास ऑफिसमध्ये बसून काम करतात. त्यामुळे प्रोसेस फुड साखरयुक्त पदार्थ, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि भरपूर फॅट असणारे अन्न सेवन केले जाते. हे अन्न वजन वाढण्यास आणि पोटावरील चरबीमध्ये वाढवण्यास कारणीभूत ठरते.

2. एका रिपोर्ट्सनुसार असेही निष्पन्न झाले आहे की, सोशल मीडियावर बहुतेकांचा जास्तीत जास्त वेळ जात असल्याने शारीरिक हालचाल होत नाही. यामुळेच या सोशल मीडिया साईट्स वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात.

आम आदमी विमा योजनेचा लाभ कसा मिळवावा?

3. तुमची काम करण्याची वृत्ती तुमच्या पोटावरील चरबीवर परिणाम करू शकते. नऊ ते पाच या ऑफिसच्या वेळेत एकाच जागेवर बसून काम केले जाते त्यामुळे शारीरिक हालचाल होत नाही. यामुळे फॅट बर्निंग एन्झाइम, लिपोप्रोटीन लिपेसची क्रिया कमी होते. त्यामुळे, वारंवार उभे राहा आणि स्ट्रेचिंग करा, वॉशरूम ब्रेक घ्या, पाणी प्या आणि अधूनमधून ऑफिसमध्ये फिरा. सोबतच दररोज व्यायाम करण्यासाठी वेळ काढा.

4. अल्कोहोलमध्ये कॅलरीज जास्त असतात ज्यामुळे तुमची भूक वाढते. म्हणून अल्कोहोलचे अति सेवन पोटाची चरबी वाढण्यासही कारणीभूत ठरते.

5. ताणतणाव आणि हार्मोनल असंतुलनामुळे वजन वाढू शकते. खरं तर, आपल्या एड्रेनल ग्रंथी तणावाच्या काळात एड्रेनालाईन आणि कोर्टिसोलसारखे हार्मोन्स सोडतात ज्यामुळे शरीरात चरबी जमा होते.

Health Update : बसून काम करणाऱ्यांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतोय; चरबी घटवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

6. झोपेच्या कमतरतेमुळे कॉर्टिसॉल हार्मोन देखील वाढतो ज्यामुळे तणाव वाढतो. स्ट्रेस हार्मोन्स हे आपल्या अती खाण्याला चालना देतात. जर तुम्ही नीट झोप घेत नसाल तर त्याचा मेंदूतील निरोगी राहण्याच्या समजावर परिणाम होतो, ज्यामुळे पौष्टिक अन्न न घेतल्याने पोटाची चरबी वाढते.

Tags

follow us