Health Update : बसून काम करणाऱ्यांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतोय; चरबी घटवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
Reduce Belly Fat : सध्याचा काळ हा धावपळीचा आहे. असं आपण नेहमी म्हणतो मात्र त्या धावपळीमध्ये देखील आणखी एक मोठा धोका वाढत आहे. तो म्हणजे लठ्ठपणा. सध्या अनेक जण ऑफिस किंवा वर्क फ्रॉम होममध्ये सिंटींग जॉब करत आहेत. काम करत असताना अनेकांना हे लक्षातच येच नाही की, आपण तासन् तास एकाच जागेवर बसून असतो. ( Increasing Obesity due to Sitting Jobs do this remedies )
Manohar Joshi यांच्या प्रकृतीत सुधारणा, रूग्णालायातून देण्यात आला डिस्चार्ज
या सिटींग जॉबमुळे लठ्ठपणाचा धोका वाढत आहे. कोणत्यांही वयाच्या लोकांना ही समस्या जाणवायला सुरूवात झाली आहे. यामध्ये पोट आणि कंबरेच्या जवळची चरबी वाढते. इतर अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणे, ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, ट्रिपल वेसलच्या समस्या आणि कोरोनरी आर्टरी या आजारांनी निमंत्रण मिळते. त्यामुळे या समस्यांपासून दूर राहण्यासाठी लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते.
लठ्ठपणा दूर करण्यासाठी उपाय :
लठ्ठपणा दूर करण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. मात्र हे उपाय काही औषधं नाहीत. कारण त्याचे शरीरीवर दुष्परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्याचबरोबर कोणत्याही आजारांवरनंतर उपाय करण्यापेक्षा ते होऊ नयेत किंवा ते वाढू नये म्हणून काळजी घेणे जास्त गरजेचे असते. त्यामुळे लठ्ठपणा दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत? पाहूयात…
भारताचा 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौरा, पाहा संपूर्ण वेळापत्रक
1. तेलकट पदार्थ तुमच्या लठ्ठपणाला कारणीभूत ठरणारी पहिली गोष्ट आहे. यामुळे आपल्या शरीरात चरबी जमा व्हायला मदत होते. त्यातू शरीराला मोठ्या प्रमाणात कॅलरिज मिळतात. त्यात भर सिटींग जॉब करणारी लोकं तासन् तास एकाच जागेवर बसून असल्याने त्यांच्या रॅलरिज बर्न होत नाहीत. त्यामुळे लठ्ठपणा येतो.
2 त्याचबरोबर एकाच जागेवर बसणाऱ्या लोकांनी स्नॅक्स खाणं बंद करणं अत्यंत गरजेच आहे. त्यामध्ये तळलेल, मैद्याचे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ असतात. त्यामुळ दररोजच्या आहारात हेल्दी पदार्थ आणि जेवण घेण्याचा प्रयत्न करा.