भारताचा 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौरा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारताचा 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौरा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

India vs West Indies: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर भारतीय संघाचे पुढील मिशन वेस्ट इंडिज असणार आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयने संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.

पुढील महिन्यापासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय संघ जुलैमध्ये एक महिन्याहून अधिक काळ कॅरेबियन बेटांवर असेल. यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. हा दौरा 12 जुलैपासून सुरू होणार असून शेवटचा सामना 12 ऑगस्टला होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 फॉरमॅटमध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

मध्य प्रदेशात सचिवालयाला भीषण आग, अनेक सरकारी फायली जळाल्या

वास्तविक, क्रिकेट वेस्ट इंडिजने (CWI) आज (सोमवारी) या बहुप्रतिक्षित दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. यादरम्यान, डॉमिनिका आणि त्रिनिदाद येथे खेळले जाणारे दोन्ही कसोटी सामने 2023-2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलचा भाग असतील. डोमिनिकाचे विंडसर पार्क 12 ते 16 जुलै दरम्यान पहिला कसोटी सामना खेळणार आहे. 20 जुलैपासून क्वीन्स पार्क ओव्हल येथे होणारा दुसरा कसोटी सामना दोन्ही देशांमधील 100 वा सामना असेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube