मध्य प्रदेशात सचिवालयाला भीषण आग, अनेक सरकारी फायली जळाल्या

मध्य प्रदेशात सचिवालयाला भीषण आग, अनेक सरकारी फायली जळाल्या

Bhopal Fire Incident: मध्य प्रदेशचे भोपाळमधील सचिवालय सतपुडा भवनला आज (सोमवारी) सायंकाळी 4 वाजता भीषण आग लागली आहे. तिसऱ्या मजल्यावरून सुरू झालेली आग सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे. आगीवर नियंत्रण मिळवता न आल्याने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मदत मागितली आहे.

संरक्षणमंत्र्यांच्या सूचनेनुसार एएन 32 विमाने आणि एमआय 15 हेलिकॉप्टर आज रात्री भोपाळला पोहोचतील. यामुळे आग विझवण्यात मोठी मदत होईल. भोपाळचे राजाभोज विमानतळ रात्रभर सुरू राहणार आहे. आगीचे कारण शोधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 4 सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

कागदपत्रे जळून खाक सातपुडा भवनमध्ये अनेक विभागांची कार्यालये असून, त्यात ठेवलेली कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. चौथ्या मजल्यावरील आरोग्य विभागाच्या तक्रार शाखेत ईओडब्ल्यू आणि लोकायुक्त यांनी कर्मचारी-अधिकाऱ्यांवर केलेल्या तक्रारी आणि तपासांसह इतर फायली आणि कागदपत्रे जळाल्याची माहिती आहे.

काँग्रेस आमदाराचा दिव्य प्रताप; बसचा रिव्हर्स गिअर टाकत गाड्यांचा केला चक्काचूर

भोपाळ येथील सातपुडा भवनला लागलेल्या आगीमुळे मध्य प्रदेशात राजकारण चांगलेच तापले आहे. आगीच्या या घटनेवरुन काँग्रेसने शिवराज सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या आगीत सरकारच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे जळून खाक झाल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जीतू पटवारी यांनी केला आहे.

राष्ट्रवादीच्या खजिन्याच्या चाव्या सुनील तटकरे यांच्याकडे…

या आगीच्या घटनेबाबत जितू पटवारी म्हणाले, “सातपुडा भवनला आज पुन्हा आग लागली. 50 टक्के कमिशन घेऊन सरकारच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे जळून खाक झाली. ही आग पहिल्यांदाच लागलेली नाही, याआधी 18 सप्टेंबर 2018 रोजी ही आग लागली होती. ही आग फक्त सातपुडा भवनातच का लागते? मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार येत असल्याने ही आग लावली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube