काँग्रेस आमदाराचा दिव्य प्रताप; बसचा रिव्हर्स गिअर टाकत गाड्यांचा केला चक्काचूर

काँग्रेस आमदाराचा दिव्य प्रताप; बसचा रिव्हर्स गिअर टाकत गाड्यांचा केला चक्काचूर

Congress MLA : कॉंग्रेसच्या महिला आमदाराचा बस चालवतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या बस चालवत असून त्यांच्या शेजारी बस ड्रायव्हर देखील होता. मात्र त्यांनी अचानक रिव्हर्स गिअर टासल्याने मोठा अनर्थ घडला. ही बस मागे गेली त्यामुळे पार्किंगमध्ये मागे उभ्या असलेल्या काही गाड्यांना तिने धडक दिली. त्यामुळे गाड्यांचं नुकसान झालं. मात्र शेजरी असलेल्या ड्रायव्हरने तात्काळ प्रसंगावधान दाखवत बसचं स्टेअरिंक आपल्या हातात घेतलं. मात्र यावेळी सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. ( Lady Congress MLA Drive Bus but accidentally push back gear in Karnataka )

>Kajol कडून आयुष्यातील नैराश्याचा उलगडा; म्हणाली हा तर ‘द ट्रायल…’

हा प्रकार कार्नाटकमध्ये घडला आहे. कारण नुकतचं कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचं सरकार आलं आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी महिलांसाठी मोफच बस सेवा सुरू केली आहे. ‘शक्ती योजना’ असं या योजनेचं नाव आहे. या योजनेचं उद्घाटन पार पडत असतना. आमदार रूपकला यांनी स्वतः महिलांना हे मोफत बस प्रवासासाठीचे पास वाटले. तसेच त्यांनी महिलांना बसमध्ये बसवून स्वतः बस देखील चालवली याचवेळी हा प्रकार घडला.

आमदार राम शिंदेंना जिवे मारण्याची धमकी देणारा अट्टल गुन्हेगार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दरम्यान कर्नाटकमध्ये कॉंग्रेस सरकारच्या पाच अश्वासनांपैकी एक असलेल्या ‘शक्ती’ योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे आता महिला रविवारपासून सरकारी बसेसमध्ये मोफत प्रवास करू शकणार आहेत. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या सुविधेमुळे 41.8 लाखहून अधिक महिला सरकारी बसेसमध्ये मोफत प्रवास करू शकणार आहेत. त्याचबरोबर सरकारी तिजोरीवर यामुळे दरवर्षी 4,051.56 कोटी रुपयां.चा भार पडणार आहे. ही योजना, राज्यातील मूळ निवासी महिलांसाठी रविवार दुपारी एक वाजेपासून सुरू करण्यात आली आहे.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने पाचवे आश्वासन दिले होते. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांना सार्वजनिक वाहतूक बसमध्ये मोफत प्रवास करण्याचे आश्वासन पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दिले होते. पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी राहुल उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात प्रचारा दरम्यान त्यांनी हे अश्वासन दिले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube