आमदार राम शिंदेंना जिवे मारण्याची धमकी देणारा अट्टल गुन्हेगार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आमदार राम शिंदेंना जिवे मारण्याची धमकी देणारा अट्टल गुन्हेगार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

MLA Ram Shinde on Death threat : चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या आदल्यादिवशी (30 मे) रोजी भाजप नेते आणि आमदार राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आमदार रोहित पवार यांचा संपर्क देत राम शिंदेंना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी अमित चिंतामणी यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित अरुण चिंतामणी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडी येथील पुण्यतिथी कार्यक्रमाची तयारी करीत असताना त्यांच्या मोबाईलवर सागर गवासणे याने फोन करुन धमकी दिली होती. त्यामध्ये म्हटले होते की तुम्ही राम शिंदे साहेबांच्या जवळचे आहात त्यांना जुळवून घेण्याचे सांगा नाहीतर पाहुन घेईन अशी धमकी चिंतामणी यांना दिली होती. त्यानंतर फेसबुक लाईव्ह करुन आमदार राम शिंदे साहेब व अपरिचीत व्यक्तीचे नाव घेऊन घरात घुसून मारीन अशी धमकी देऊन दोन राजकीय पक्षाचे लोकांमध्ये तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. घटनेबाबत फिर्यादीने जामखेड पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन जामखेड पोलीस स्टेशन अदखलपात्र दाखल करण्यात आला होता.

Nana Patole : …म्हणून मी प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटणार नाही, पटोले स्पष्टच बोलले

या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून घटनेचा तपास करुन आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते. यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, राम माळी, रविंद्र कर्डिले, पोना/सचिन अडबल, प्रशांत राठोड, राहुल गुड्डू , मेघराज कोल्हे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या विशेष पथकाची नेमणूक केली होती.

Maharashtra Politics : भाजप CM शिंदेच्या मुलाला का करतयं टार्गेट?; राष्ट्रवादीनं शोधलं उत्तर

यानंतर विशेष पथकाचा मध्यप्रदेशातील उज्जैन व इंदौर परिसरात आरोपीचा शोध सुरु होता. तपास करत असताना धमकी देणाऱ्या तरुणाला उज्जैन परिसरातून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला सागर सुभाष गवासणे (वय ३४) रा. पिंपळगाव उंडा, ता. जामखेड येथील रहिवाशी असून सध्या तो वाकड, जि. पुणे येथे स्थायिक आहे. धमकी देणारा सागर गवासणे हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुध्द अहमदनगर आणि बाहेर जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे 10 गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube