Nana Patole : …म्हणून मी प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटणार नाही, पटोले स्पष्टच बोलले

Nana Patole : …म्हणून मी प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटणार नाही, पटोले स्पष्टच बोलले

Nana Patole : कॉंग्रेस (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवले जाणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि इतर नेते यांच्यातील अंतर्गत वाद पाहायाला मिळत आहे. पटोलेंवर (Nana Patole) यांच्यावर काँग्रेसमधील काही नेते नाराज आहेत. काही नेत्यांनी त्यांची थेट कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ( I will not resign as state precedent of congress said Nana Patole)

‘अभिजीत पाटील यांनी फडणवीस यांच्या पायावर लोळण घेतली’

माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या मुद्द्यावर म्हणाले की, वर्षा गायकवाड यांची मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ही एक संघटनात्मक बदलांची प्रक्रिया आहे. त्यात नवीन काही नाही. तसेच कुणाला विरोध करण्याचं कारण नाही. तर यावेळी भाजपकडून पटोलेंच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून करण्यात येत असलेल्या टीकेवर पटोले म्हणाले, भाजपवाल्यांचं काय मी प्रदेशाध्यक्ष पदावरून हटाव अशी त्यांची इच्छा आहे. पण त्यांना वाटत म्हणून मी प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटणार नाही. असं यावेळी नाना पटोले म्हणाले.

Gunratna Sadavarte यांची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले… ‘महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेसोबत…’

त्याचबरोबर पुढे, पंढरपूरच्या वारीसाठी रविवारी श्रीक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. मात्र, यावेळी पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवण्यात येत असून पटोलेंनी देखील यावर याचा निषेध केला.

पटोले म्हणाले, वारकऱ्यांवर ज्या पद्धतीचा लाठीचार्ज करण्यात आला. त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो. महाराष्ट्रात वारकरी प्रथा ही महाराष्ट्राची ओळख आहे. राज्याची परंपरा आहे. त्याच परंपरेला संपवण्याचं पाप जाणीवपूर्वक भाजप सरकार करत आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज असतील त्याकाळातही मनोस्मृतिचा विरोध केला होता पंढरपूरसारख्या छोट्या ठिकाणी दहा लाखाच्या वर लोक वर्षानुवर्ष येतात. या ठिकाणी गोळा होतात पण असं कधीही झालं नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube