Gunratna Sadavarte यांची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले… ‘महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेसोबत…’

Gunratna Sadavarte यांची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले…  ‘महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेसोबत…’

Gunratna Sadavarte on Gandhi-Godase : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी प्रसिद्ध असलेल्या निलंबित वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गलिच्छ भाषेमध्ये टीका केली आहे. दरम्यान याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य देखील केलं आहे. त्यामुळे आता सदावर्तेंच्या या विधानावरून आणखी गदारोळ होण्याची शक्यता आहे. ( Gunratna Sadavarte Controversial statement on Mahatma Gandhi and Nathuram Godase )

पवार म्हणजे वैचारिक व्हायरस; सदावर्तेंनी ‘गुण’ उधळले

गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी थेट महात्मा गांधी आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांच्याबद्दल विधान केले आहे. त्यांनी नथुराम गोडसेचा आदरार्थी उल्लेख करत त्यांच्याबरोबर अन्याय झाल्याचं म्हटलं आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी नथुराम गोडसे यांचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत लावला होता. तर दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गलिच्छ भाषेमध्ये टीका केली आहे.

CoWIN पोर्टलवरून डेटा लीक? विरोधी पक्षनेत्यांच्या दाव्यावर सरकारने दिले स्पष्टीकरण

काय म्हणाले सदावर्ते?

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, मी गांधींच्या मतांशी सहमत नाही. मी नथुराम गोडसे यांचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत लावला आहे. मी संविधानाचा अभ्यासाक आहे. नथुराम गोडसे यांचा खटला चालला. त्यात नथुराम गोडसे यांच्यासोबत न्याय झाला नव्हता. मी संविधानात पीएचडी केली तेव्हा लक्षात आलं की, गोडसेंच्या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ते माझ्या चळवळीत असतील. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. त्याचबरोबर शरद पवारांवर टीकाही केली.

दररम्यान त्यांनी शरद पवारांवर देखील टीका केली. शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस आहेत. पवारांच्या विचारांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यभरात लसीकरण सभा घेणार असल्याचे सदावर्तेंनी सांगितले आहे. काय तर म्हणे शरद पवारांना धमकी आली. यांना कोण धमकी देईल. मागणी करायला देखील मुलगीच गेली. दाऊद इब्राहिम कुणाच्या काळात फळला-फुळला, असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube