Kajol कडून आयुष्यातील नैराश्याचा उलगडा; म्हणाली हा तर ‘द ट्रायल…’

Kajol कडून आयुष्यातील नैराश्याचा उलगडा; म्हणाली हा तर ‘द ट्रायल…’

Kajol depression : अभिनेत्री काजोलने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक चिंताजनक पोस्ट शेअर करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्या पोस्टमध्ये तिने मी माझ्या जीवनातील नैराश्याच्या टप्प्यातून जात असल्याचे स्पष्ट केले होते. त्यासाठी तिने सोशल मीडियावर असणाऱ्या तिच्या सर्वच पोस्ट डिलीटसुद्धा केल्या होत्या. त्यावर काजोलच्या चाहत्यांनाही तिच्याबद्दल चिंता वाटत होती. पण आता तिने नवीन पोस्ट शेअर करत हा सगळा ‘द ट्रायल – प्यार, कानून, धोका’ या वेबसीरिजच्या प्रमोशनचा एक भाग असल्याचं स्पष्ट केलं आहे. ( Kajol Expose about depression said this is part of The Trial Web series Part )

फुकटेगिरी आली अंगलट; कटिंगसाठी मोजावे लागेल तब्बल 57 हजार

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री काजोल ही लवकरच ‘द ट्रायल…’ या वेबसीरिजमधून ओटीपी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. 12 जून रोजी या वेब सिरीज चा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून या सीरीजमध्ये काजोल नोयोनिका सेनगुप्ता ही भूमिका साकारत आहे. या वेबसीरिजचा दोन मिनिटांचा ट्रेलर प्रेक्षकांना खेळवून ठेवत आहे. यात काजोल नेहमीपेक्षा हटके आणि दमदार भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर पाहून चाहत्यांकडून काजोलच्या अभिनयाचं चाहत्यांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.

Prabhu Deva: गो गो गो गोविंदा; वयाच्या 50 व्या वर्षी प्रभुदेवा बनला चौथ्यांदा बाप

ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर काजोलने साकारलेल्या भूमिकेचे म्हणजेच नोयोनिका सेनगुप्ताचे पती, हे अतिरिक्त न्यायाधीश राजीव सेनगुप्ता यांना लाच म्हणून सेक्सची मागणी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येते. त्यानंतर सेक्स स्कँडलप्रकरणी नवऱ्याला अटक झाल्यावर नोयोनिकावर दोन मुलींची जबाबदारी पडते. मुलींची जबाबदारी खांद्यावर पडल्यामुळे नोयनिका पुन्हा एकदा वकील म्हणून तिच्या करिअरला सुरुवात करते.

तेव्हा नोयोनिकाचा नवरा त्याची केस लढण्याची बायकोला विनंती करतो. एकंदरीत असा घटनाक्रम ‘द ट्रायल…’ च्या ट्रेलर मध्ये दाखवण्यात आला आहे. सेक्सची मागणी, न्यायालयातील लढाई आणि सामान्य गृहिणीचा वकील होण्यापर्यंतचा प्रवास, अशी पार्श्वकथा असल्याचं ट्रेलरवरून लक्षात येत आहे. प्रत्यक्षात मात्र ही वेबसीरिज कशी असेल? याचा उलगडा हा 4 जुलैला होईल. ‘द ट्रायल – प्यार, कानून, धोका’ ही वेबसीरिज 4 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. काजोलचे चाहते याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube