Prabhu Deva: गो गो गो गोविंदा; वयाच्या 50 व्या वर्षी प्रभुदेवा बनला चौथ्यांदा बाप

Prabhu Deva: गो गो गो गोविंदा; वयाच्या 50 व्या वर्षी प्रभुदेवा बनला चौथ्यांदा बाप

Prabhu Deva: आपल्या जबरदस्त कोरिओग्राफीने बॉलीवूड मधील अनेक गाणे अजरामर करणाऱ्या तसेच दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभू देवाच्या (Prabhu Deva) आयुष्यात आनंदाची भर पडली आहे. (Entertainment) ते म्हणजे अभिनेत्याला पुन्हा एकदा पितृत्व प्राप्त होत, (BOLLYWOOD) त्याच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prrabhudeva (@prabhudevaofficial)


प्रभू देवाची दुसरी पत्नी हिमानीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (social media) अभिनेत्याने हिमानी सोबत 2020 मध्ये लग्न केले होते. वडील झाल्याच्या आनंदाची पोस्ट शेअर करत प्रभुदेवा म्हणाला ‘हो! ते खर आहे. या वयात म्हणजे 50व्या वर्षी मी पुन्हा बाप झालो आहे. सध्या मी खूप आनंदी आहे आणि मला पूर्णत्वाची भावना येत आहे’.

महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अभिनेत्याच्या कुटुंबात जन्मदिनी ही पहिलीच मुलगी आहे. या अगोदर प्रभुदेवाला तीन मुले आहेत. मुलीच्या आगमनाने हर्षानंदित झालेल्या अभिनेत्याला आता जास्त वेळ घरी घालवायचा आहे. त्यासाठी त्यांनी त्याच्या कामाचा ताण सुद्धा कमी केल आहे. अभिनेता स्वतः सांगतो की त्याला असं वाटते, मी खूप काम करत आहे आणि फक्त धावत आहे. त्यामुळे आता मला माझ्या कुटुंबीयांसोबत थोडा वेळ घालवायचा आहे.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

बॉलीवूड (Bollywood) आणि टॉलीवूडमध्ये (Tollywood) सुद्धा एक दिग्दर्शक अभिनेता म्हणून त्याची कारकीर्द चमकदार राहिली आहे. तर एक कोरिओग्राफर म्हणून प्रभू देवाची कारकीर्द मोठी आणि लोकप्रिय आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील नावाजलेला डान्सर म्हणून प्रभुदेवाचे नाव घेतलं जातं आणि त्याचा चाहता वर्ग सुद्धा मोठा आहे. इतकच काय तर भारतातच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत.

सन 2011 मध्ये प्रभुदेवाची पहिली पत्नी रामलता हिच्याशी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर 2020 मध्ये मुंबईतील फिजिओथेरपिस्ट असणाऱ्या हिमानी सिम सोबत त्याने लग्न केले. आता त्यांच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचे आगमन झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube