फुकटेगिरी आली अंगलट; कटिंगसाठी मोजावे लागेल तब्बल 57 हजार
Free Fraud Offer : तुम्हीही फ्री ऑफर्स शोधत असाल तर सावधान. मोफत सेवेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्याचे काम जोरात सुरू आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका साध्या व्यक्तीने मोफत व्हाउचरसाठी आपला जीव धोक्यात घातला. हे प्रकरण नक्की काय घडले ते पाहूया…
चीनमध्ये हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चीनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या एका मित्राने 230 रुपयांचे मोफत हेअर कटिंग व्हाउचर दिले होते. हे व्हाउचर मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला. या व्यक्तीचे नाव ली (आडनाव) आहे. ली जेव्हा केस कापण्यासाठी गेला तेव्हा केस कापण्याआधी त्याला सलूनमध्ये हेड मसाज देण्यात आला.
CoWIN पोर्टलवरून डेटा लीक? विरोधी पक्षनेत्यांच्या दाव्यावर सरकारने दिले स्पष्टीकरण
डोक्याला मसाज देण्यापूर्वी लीचा चष्मा काढण्यात आला. लीने सांगितले की, माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्ट वापरण्यात आली आणि नंतर मला दर यादी दाखवण्यात आली. चष्म्याअभावी लीला सर्व काही अस्पष्ट दिसत होते. अनेकवेळा विचारणा करूनही त्याला कोणीही दर यादी दाखवली नाही.
मोठी बातमी! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध
यानंतर त्याला 57 हजार रुपयांचे बिल देण्यात आले. त्याने विरोध करून माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगताच सलूनचे सर्व कर्मचारी जमले आणि त्याला धमकावू लागले. ली यांचा फोन बळजबरीने हिसकावून घेतला आणि त्याच्या फोनवरून क्रेडिट अॅपद्वारे अप्रूव झालेले 57 हजारांचे कर्ज घेतले. ही बाब निदर्शनास येताच अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. या प्रकरणानंतर संबंधित सलून बंद आहे.