Download App

Train: भारतातील ‘या’ रेल्वे ७० स्टेशन्स अन् १३ राज्यांतून मारतात फेरफटका

Longest Train Journey: भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. देशातील प्रत्येक राज्य, शहर जोडण्यासाठी रेल्वे सेवा आहे. भारतात दररोज १३ हजारांहून अधिक ट्रेन धावतात. दररोज सुमारे 8 कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वे सेवेमध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट आणि शताब्दी यासह अनेक गाड्यांचा समावेश आहे. कमी वेळेत लांबचे अंतर कापण्यासाठी रेल्वे सेवा हा उत्तम पर्याय आहे.

अख्खा भारत फिरायचा असेल तर तुम्ही कमी बजेटमध्ये ट्रेनने फिरू शकता. अशा अनेक गाड्या आहेत, ज्या लांब पल्ल्याचा प्रवास करतात. सर्वात लांब पल्‍ल्‍याच्‍या ट्रेनपैकी एक ट्रेन ही 4000 किमी पेक्षा जास्त अंतर कापते.
सर्वात लांबचा प्रवास करणाऱ्या भारतातील कोणकोणत्या ट्रेन आहेत, त्याबद्दल जाणून घ्या.

कोईम्बतूर-सिलचर एक्सप्रेस

कोईम्बतूर ते सिलचर दरम्यान प्रवास करणाऱ्या या सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनचा नंबर आहे 12515. ही ट्रेन 3492 किलोमीटर अंतर कापते. या प्रवासा दरम्यान ट्रेन 46 स्थानकांवर थांबते. या ट्रेनचा मार्ग सेलम जंक्शन वरून निघून विजयवाडा जंक्शन, बालुगाव, बालासोर, मालदा टाउन, कामाख्या, गुवाहाटी आणि नंतर सिचलर या मार्गाने धावते.

हिमसागर एक्सप्रेस

हिमसागर एक्स्प्रेस कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिर ते कन्याकुमारी दरम्यान धावते. या ट्रेनचा क्रमांक आहे 16318. ही साप्ताहिक ट्रेन आहे. हिमसागर एक्सप्रेस 3787 किलोमीटर अंतर कापते. या दरम्यान, ट्रेन 12 राज्यांमधून जाते आणि 70 स्थानकांवर थांबते. या ट्रेनचा मार्ग जम्मू तवी ते लुधियाना जंक्शन, आग्रा कॅंट, रोहतक, नवी दिल्ली, ग्वाल्हेर, विजयवाडा, तिरुपती, सेलम, एर्नाकुलम ते कन्याकुमारी असा आहे.

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

श्री माता वैष्णो देवी मेल एक्सप्रेस

माता वैष्णोदेवी मेल एक्सप्रेस ही तामिळनाडूतील तिरुनेलवेली ते माता वैष्णो देवी कटरा अशी धावते. या ट्रेनचा क्रमांक 16787 आहे. या प्रवासादरम्यान ही ट्रेन 59 स्थानकांवर थांबते. संपूर्ण प्रवास पूर्ण करण्यासाठी या ट्रेनला एकूण 71 तास 20 मिनिटे इतका वेळ लागतो. ही ट्रेन तिरुनेलवेली जंक्शन, मदुराई जंक्शन, इरोड जंक्शन, नेल्लोर, नागपूर जंक्शन, भोपाळ, आग्रा कॅंट, निजामुद्दीन जंक्शन, रोहतक, लुधियाना, पठाणकोट कॅंट ते कटरा या मार्गाने धावते.

Tags

follow us