Download App

Maha RERA Bharti 2023: महारेरा अंतर्गत या पदासांठी अर्ज सुरू, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज

  • Written By: Last Updated:

Maha RERA Bharti 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी गुड न्यूज आहे. राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रातील लाभार्थी, प्रवर्तक आणि एजंट इत्यादींच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (Maharashtra Real Estate Regulatory Authority) अंतर्गत भरती सुरू झाली आहे. या महारेरा भरती अंतर्गत वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार, MahaRERA फेलोशिप पदाच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.

या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन (ई-मेल) अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर 2023 आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार नोटिफिकेशमध्ये दिली आहे.

पदाचे नाव – वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार, MahaRERA फेलोशिप

एकूण पदांची संख्या – 10 जागा

शैक्षणिक पात्रता –
वरिष्ठ कायदेशीर सल्लागार – LLB आणि दहा वर्षाचा अनुभर
कनिष्ठ कायदेशीर सल्लागार – LLB आणि तीन वर्षाचा अनुभव
महारेरा फेलोशिप – एमबीए (साठ टक्के गुणांसह)
एमएससीयाटी प्रमाणपत्र

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – techoff2@maharera.mahaonline.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://maharera.maharashtra.gov.in/

असा अर्ज करा-
भरतीसाठी अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे.
शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्ज सबमिट करण्यासाठी तपशीलवार सूचना वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेल्या सुचना नीट वाचाव्या आणि मगच अर्ज करावा. अर्जात काही त्रुटी राहिल्या तर अर्ज बाद केला जाईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर 2023 आहे.

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1OQN7cU1Pd87oYBHJ_2XQMSjBJxTgKjL6/view

Tags

follow us