Download App

महावीर जयंती; जाणून घ्या, भगवान महावीरांची तत्त्वे आणि महत्व

मुंबई : आज महावीर जयंती (Mahavir Jayanti 2023) आहे. महावीर जयंती जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर (Mahavir Jayanti importance) यांना समर्पित आहे. महावीर जयंती ही भगवान महावीर यांचा जन्मदिवस म्हणून साजरी केला जाते. या दिवशी दिनदर्शिकेनुसार, महावीर जयंती चैत्र शुक्ल पक्षातील त्रयोदशीला चैत्र महिन्यांच्या 13 व्या दिवशी साजरी केली जाते. भगवान महावीरांनी जैन धर्माची स्थापना केली होती.

भगवान महावीरांचा जन्म बिहारमधील कुंडग्राम येथे इ.स.पूर्व 599 च्या सुमारास झाला. त्यांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. वयाच्या 30 व्या वर्षी महावीरांनी राजवाड्यातील सुखांचा त्याग करून संन्यास घेतला असे म्हणतात. संन्यास घेतल्यानंतर ते सत्याच्या शोधात जंगलात गेले आणि तेथे त्यांनी बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली. कठोर तपश्चर्या करून रिजुबालुका नदीच्या काठावरील साल वृक्षाखाली त्यांना कैवल्यज्ञान प्राप्त झाले.

भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; लोको पायलट पदांच्या २३८ जागांसाठी भरती सुरू

महावीर जयंतीचे महत्व :
भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर आहेत. महावीर जयंतीचा दिवस जैन धर्मीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी लोक प्रभातफेरी, पुजा आणि मिरवणूक काढतात. जैन धर्माच्या संस्थापकाने अहिंसा आणि आध्यात्मिक स्वातंत्र्याचा उपदेश केला आहे. माणसाने सर्व प्राणिमात्रांचा आदर व सन्मान केला पाहिजे.

जैन धर्माचे संस्थापक महावीर यांचा जन्म अशा युगात झाला जेव्हा हिंसाचार, पशुबळी, जातीय भेदभाव शिगेला पोहोचला होता. सत्य आणि अहिंसा या विशेष शिकवणुकीतून त्यांनी जगाला योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की सत्य आणि अहिंसा हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, व्यक्तीला आध्यात्मिक शांती आणि मोक्ष प्राप्त होतो.

Tags

follow us