भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; लोको पायलट पदांच्या २३८ जागांसाठी भरती सुरू
भारतीय रेल्वेचं (Indian Railways) जाळं हे देशाच्या कानोकोपऱ्यात जाऊन पोहोचलं आहे. दररोज लाखो प्रवासी हे रेल्वेतून प्रवास करतात. रेल्वेचा हा पसारा सांभाळण्यासाटी रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways) मनुष्यबळाची गरज असते. त्यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रिया करत असते. आताही भारतीय रेल्वे विभागातर्फे असिस्टंट लोको पायलट (Loco Pilot) पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणवण्यात येत आहेत. लोको पायलट हे रेल्वेमधील वरीष्ठ स्तरावरील पद असून लोको पायलट हे ट्रेन चालवण्याचं काम करत असतात. भारतीय रेल्वे भरती 2023 च्या अधिकृत नोटिफिकेशमध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी एकूण 238 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील लेव्हल2 प्रमाणे मासिक पगार देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार हे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करू शकतात.
एकूण जागा – 238
पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट
शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांनी दहावी पास उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
याशिवाय, उमेदवारांनी फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ/ टीव्ही), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटार वाहन), वायरमन, टॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉईल वाईंडर, मेकॅनिक (डिझेल), हिट इंजिन या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे.
किंवा
मेकऐनिकल/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स
/ऑटोमोबाईल इंजिनिअरींगमध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा–
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 1 जुलै 2023 पर्यंत 43 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
ओबीसी प्रवर्गातील 45
एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांचे वय 47 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याशी बेईमानी केली; चंद्रशेखर बावनकुळेंचं टीकास्त्र
पगार – 19000 रुपये
अर्ज शुल्क – नील
जाहिरात – https://www.rrcjaipur.in/storeWebFiles/423_566625.pdf
●अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मे 2023
● अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या : https://www.rrcjaipur.in/