उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याशी बेईमानी केली; चंद्रशेखर बावनकुळेंचं टीकास्त्र
नागपूर : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या वज्रमुठ सभेची राज्याभरात चर्चा आहे. कालच्या वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरेंसह महाविकास आघा़डीतील नेत्यांनी भाजप आणि शिंदे सरकारचा जोरदार समाचार घेतला. दरम्यान, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली. सत्तेत आल्या आल्या उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याशी बेईमानी केल्याची टीका बानकुळेंनी केली.
बावनकुळेंनी आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली. बावनकळे यांनी सांगितलं की, 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपचा विश्वास घात केला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत ते सत्तेवर आले. सत्तेवर आल्या आल्या उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याशी बेईमानी केली. देवेंद्र फडणवीस याचं राज्यात सरकार सत्तेत असताना त्यांनी मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी वॉटर ग्रीडची योजना तयार करण्यात आली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर ही मराठवाड्याच्या विकासाला वेगळे वळण देणारी वॉटर ग्रीड योजना रद्द केली.
Photos: नादियाचा ओव्हर मेक-अप पाहून शाहिद आफ्रिदी झाला नाराज, पण साधेपणा पाहून बूम-बूम झाला फिदा
विदर्भ – मराठवाड्याच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक विकास महामंडळांची मुदत संपल्यावर या महामंडळांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुदतवाढ दिली गेली नाही. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा विषय संपवा मग वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देऊ, अशी भाषा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना वापरली होती. असं बोलणाऱ्या व्यक्तीला छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन सभा घेण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल त्यांनी केला. आणि आता हीच मंडळी मराठवाड्याच्या विकासाच्या नावाने गळा काढत असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पीक विमा योजनेचा बट्ट्याबोळ करून शेतकऱ्यांचे नुकसान केले गेले. ठाकरेंनी फक्त पीक विमा कंपन्यांना पोसण्याचं काम केलं. शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना अवघ्या एका रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजीनगर नामांतर निर्णय मोदी सरकारने घेतला, मात्र खोटेनाटे सांगून महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे हे त्याचे श्रेय लाटत आहे. महाविकास आघाडीने औरंगाबादच नामांतर संभाजीनगर करायला केंद्रात उद्धव आहे का, असा एकेरी सवलाही त्यांनी केला. केवळ सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे रेटून खोटं बोलत आहेत, असं ते म्हणाले. संभाजीनगर मध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांना महत्वाचे स्थान होते. त्यांच्यासाठीची खुर्चीही वेगळी होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना या सभेच्या व्यासपीठावर दुय्यम स्थान दिले गेले होते. महाविकास आघाडीतील मतभेद या सभेवेळी स्पष्टपणे दिसून आले, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.