Download App

Mahavir Jayanti 2023: भगवान महावीर यांचा जीवनप्रवास आणि त्यांचे प्रेरक विचार

  • Written By: Last Updated:

‘अहिंसा परमो धर्म’ अशी शिकवण देणाऱ्या भगवान महावीर (Lord Mahavir) यांची आज जयंती आहे. भगवान महावीर यांनी सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली. त्यांना वर्धमान या नावानेही ओळखले जाते. महावीर जयंतची हा जैन धर्मियांचा सर्वांत मोठा सण आहे. आजच्या दिवसी जैन धर्मिय लोक एकत्र येऊन भगवान महावीर यांचं नामस्मरणक करतात.

भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार आहेत. त्यांचा जन्म बिहारमधील वैशाली कुंड गावात झाला. महावीर यांच्या वडिलांचे नाव सिध्दार्थ असे होते, तर त्यांच्या आईचे नाव त्रिशला होते. एका मान्यतेनुसार, भगवान महावीर यांचा जन्म होणार होता, त्यावेळी त्यांच्या आईल 16 स्वप्ने पडली होती. त्यात त्यांना होणारा मुलगा हा जगाचा उद्धारक असेल, सत्य आणि अहिंसेचा प्रचारक असेल, असे ते स्वप्न होते. त्यांचे बालपण अगदी राजेशाही थाटात गेले. 8 वर्षाचे असतांना त्यांना शिक्षणासाठी शाळेत पाठवण्यात आले.

न्यायालयाचा दिलासा! चुंबन प्रकरणी शिल्पा शेट्टीला जुनाच आदेश कायम 

पुढं त्यांनी अवघ्या वयाच्या तिसाव्या वर्षी सत्याच्या शोधात आपल्या महालाचा त्याग केला होता आणि जंगलात घोर तपश्चर्या केली होती. बहुतांश वेळा ते ध्याननमग्न असत. त्यांनी तब्बल 12 वर्षांपर्यंत मौन पाळले होते. एखाद्या हटयोग्याप्रमाणे त्यांनी शरीराला खूप कष्ट दिले. त्यांननंतर त्यांना रिजुबालुका नदीत्या काठावरील एका वृक्षखाली कैवल्यज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरवात केली. त्यांनी आपल्या सर्व इंदियावर विजय मिळवला होता. नंतर त्यांनी दिंगबर रूप स्वीकारले. त्यामुळं त्यांना महावीर या नावाने ओळख मिळाली.

श्वेतांबर पंथातील एता मान्यतानुसार भगवान महावीर यांनी यशोदा यांच्याशी लग्न केलं होतं. तर दिंगबर पंथाच्या म्हणण्यानुसार त्यांनी विवाह केला नव्हता. भगवान महावीर यांनी सत्या आणि अहिंसेचा संदेश जगाला दिला. त्यांचा सर्वांत मोठा संदेश म्हणजे, त्यांनी सांगितलं होतं की, माणइसांना स्वत:वर विजय मिळवायला शिकलं पाहिजे. याशिवाय, त्यांनी पाच शिवकणी जगाला दिल्या. त्या म्हणजे, अहिंसा, अस्तेय, ब्रम्हचर्य, सत्य आणि अपरिग्रह.

महावीर जयंती 2023 शुभ मुहूर्त
पंचागानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजे, 3 एप्रिलला सकाळी 6.24 मिनिटांनी सुरु होईल. हा मुहूर्त दुसऱ्या दिवशी चार एप्रिलला सकाळी 8.05 मिनीटांनी संपेल. चार एप्रिल रोजी उदय तिथी येत असल्याने भगवार महावीर यांची जयंती ही 4 एप्रिल रोजीच साजरी केली जाईल.

महावीर यांचे विचार
जाणते किंवा अजाणतेपणी कुणाचीची हिंसा करू नये.

आपल्या किंवा दुसर्‍याच्या फायद्याकरीता खोटे बोलू नये.

लाखो लोकांवर विजय मिळवल्यापेक्षा आधी स्वत:वर विजय मिळवायला शिका.

प्रत्येक जीवावर दया करा. द्वेष केवळ विनाशाकडे नेते.

स्वत:च्या प्रकाशात स्वत:ला झोकून द्या.

Tags

follow us