Download App

जबरदस्त! अवघ्या 1 लाखात घरी आणा Maruti Baleno CNG, जाणून घ्या तपशील

Maruti Baleno CNG : देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी  Maruti Baleno CNG तुम्ही खरेदी करण्याची तयारी करत असाल

  • Written By: Last Updated:

Maruti Baleno CNG : देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी  Maruti Baleno CNG तुम्ही खरेदी करण्याची तयारी करत असाल तर भारतीय बाजारात आता Maruti Baleno CNG एक भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

या ऑफरचा फायदा घेत तुम्ही अवघ्या 1 लाखात Maruti Baleno CNG खरेदी करू शकतात. उत्तम फीचर्स आणि जबरदस्त मायलेजमुळे भारतीय बाजारात मारुती बलेनो ह्युंदाई क्रेटा, टाटा पंच आणि नेक्सॉन सारख्या कार्सना टक्कर देते.

बाजारात सुरु असणाऱ्या ऑफरचा फायदा घेत तुम्ही ही कार आता फायनान्स देखील करू शकतात आणि अवघ्या 1 लाखात कार घरी आणू शकतात. मारुती सुझुकी बलेनो सीएनजी प्रकारात डेल्टा आणि झेटा व्हेरियंटमध्ये विकली जाते. या दोन्ही व्हेरियंटच्या फायनान्स तपशील, एक्स-शोरूम किंमत आणि ऑन-रोड किंमत, तसेच फिचर्स, मायलेज, डाउन पेमेंट जाणून घ्या.

Maruti Baleno CNG किंमत

भारतीय बाजारात मारुती सुझुकी बलेनो डेल्टा सीएनजीची एक्स किंमत 8.40 लाख रुपये तर झेटा सीएनजीची एक्स-शोरूम किंमत 9.33 लाख रुपये आहे. कंपनीकडून या कारमध्ये 1197 cc पेट्रोल इंजिन तसेच CNG किट देण्यात आली आहे. यात मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय आहे, ज्याचे मायलेज 30.61 किलोमीटर प्रति किलोग्राम पर्यंत आहे. तसेच या कारमध्ये सेफ्टीसाठी  6 एअरबॅगसह अनेक फीचर्स देण्यात आले आहे.

Maruti Baleno CNG डेल्टा सीएनजी फायनान्स तपशील

Maruti Baleno CNG डेल्टा सीएनजी भारतीय बाजारात ऑन-रोड किंमत 9.44 लाख रुपये आहे. जर तुम्हाला या कारला फायनान्स करायचा असेल तर तुम्ही फक्त एक लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करून कार घरी आणू शकतात. जर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट भरले तर  तुम्हाला 8.44 लाख रुपयांचे कार कर्ज घ्यावे लागेल. तुम्हाला 5 वर्षांसाठी 10 टक्के व्याजदराने कार लोन मिळाला तर  पुढील 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 17,933 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. या डीलनुसार सुमारे 2.32 लाख रुपये व्याज लागेल.

Maruti Baleno CNG झेटा फायनान्स तपशील

भारतीय बाजारात Maruti Baleno CNG झेटा कारची ऑन-रोड किंमत 10.45 लाख रुपये आहे. या कारला फायनान्स करायचा असेल तर तुम्हाला 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंट केल्यानंतर  9.45 लाख रुपयांचे कार कर्ज घ्यावे लागेल.

शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला, जाणून घ्या कारणे

यासाठी जर तुम्हाला 5 वर्षांसाठी कार लोन मिळाला तर त्यावर 10 टक्के व्याज असेल त्यामुळे तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी दरमहा 20,078 रुपये EMI म्हणून भरावे लागतील. या डीलनुसार तुम्हाला 2.60 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. याबाबात अधिक तपशीलसाठी तुम्हाला मारुती सुझुकी नेक्सा डीलरशिपला भेट द्यावी लागेल.

follow us

संबंधित बातम्या