ठरलं, ‘या’ दिवशी लाँच होणार Hyundai Creta EV, आजच जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् रेंज

  • Written By: Published:
ठरलं, ‘या’ दिवशी लाँच होणार Hyundai Creta EV, आजच जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् रेंज

Hyundai Creta EV : भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सना उत्तम फीचर्स आणि बेस्ट रेंज मिळत असल्याने गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढत चालली आहे. यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार भारतीय बाजारात लवकरच Hyundai Motor मोठा धमाका करत Hyundai Creta इलेक्ट्रिक (Hyundai Creta EV) लॉंच करणार आहे.

समोर आलेल्या माहितीनूसार भारतीय बाजारात 17 जानेवारी 2025 रोजी कंपनी इलेक्ट्रिक क्रेटा लॉंच करणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये कंपनी एकापेक्षा एक फीचर्स तसेच उत्तम रेंज देणार आहे असल्याची चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. भारतीय बाजारात क्रेटा लॉंच झाल्यानंतर Tata Curve EV, Mahindra BE 6 तसेच MG ZS EV, BYD Atto 3 सारख्या इलेक्ट्रिक कार्संना टक्कर देणार आहे.

Hyundai Creta EV अपेक्षित फीचर्स

कंपनी Hyundai Creta इलेक्ट्रिक कारमध्ये दमदार फीचर्स देण्यात आहे. या कारची आणि सध्या बाजारात धुमाकूळ घालणारी क्रेटाची स्टाईल वेगळी असणार आहे. तसेच या कारमध्ये नवीन ग्रिल, अपडेटेड बंपर डिझाइन आणि नवीन अलॉय व्हील्स कंपनीकडून देण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Hyundai Creta इलेक्ट्रिकच्या केबिनमध्ये कंपनीकडून अनेक बदल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनी या कारमध्ये नवीन स्टीयरिंग व्हील, ड्राइव्ह सिलेक्टर आणि सेंटर कन्सोलचा समावेश करू शकते. याच बरोबर लेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, कूल्ड सीट्स, ऑटो-होल्ड फंक्शन 360-डिग्री कॅमेरा आणि नवीन ऑटो क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स ग्राहकांना इलेक्ट्रिक क्रेटामध्ये मिळू शकते.

तसेच अनेक फीचर्समध्ये देखील बदल अपेक्षित आहे. माहितीनुसार या इलेक्ट्रिक कारमध्ये ड्युअल स्क्रीन सेटअप असू शकतो, ज्यामध्ये डिजिटल कन्सोल आणि इन्फोटेनमेंट सिस्टमचा समावेश आहे.

तर दुसरीकडे या कारमध्ये 45-50 kWh क्षमतेची बॅटरी दिली जाईल अशी अपेक्षा करण्यात येत आहे. 45-50 kWh क्षमतेची बॅटरी असल्याने इलेक्ट्रिक क्रेटा एका चार्जवर 400 किमी अंतर कापू शकते. इलेक्ट्रिक क्रेटा पूर्णपणे भारतात तयार होत असल्याने बाजारात या कारची किंमत इतर इलेक्ट्रिक कार्सपेक्षा कमी असणार असल्याची देखील चर्चा भारतीय बाजारात सुरू आहे. माहितीनुसार, या कारची किंमत 20 लाखांपर्यंत असू शकते. लाँच झाल्यानंतर इलेक्ट्रिक क्रेटा Tata Curve EV, Mahindra BE 6 तसेच MG ZS EV, BYD Atto 3 इलेक्ट्रिक कार्संना टक्कर देणार आहे.

वाघोली-शिरूर दरम्यान पुलाचे काम त्वरित सुरू करावे; बापूसाहेब पठारेंची नितीन गडकरींना मागणी

तर दुसरीकडे देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकी देखील जानेवारीमध्ये आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही eVitara इलेक्ट्रिक लॉंच करणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये जबरदस्त स्पर्धा पाहिल्या मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube