दीड लाखांचा डिस्काउंट अन् 461 किमीची रेंज ; ‘या’ MG इलेक्ट्रिक कारवर जबरदस्त ऑफर
MG ZS EV : येणाऱ्या काही दिवसात तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा करण्याचा विचार करत करत असाल तर खास तुमच्यासाठी भारतीय बाजारात कमी वेळेत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी कंपनी MG मोटर्सने खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी अगदी कमी किमतीमध्ये जबरदस्त फीचर्स आणि तब्बल 461 किमीची रेंज देणारी इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकतात.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय बाजारात कंपनीने आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक कार MG ZS EV वर तब्बल दीड लाखांचा डिस्काउंट ऑफर जाहीर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी MG ZS EV वर 1.50 लाखांचा डिस्काउंट दिला आहे.
MG ZS EV फीचर्स
MG ZS EV कंपनीने एकापेक्षा एक फीचर्स दिले आहे. या कारमध्ये कंपनीने 50.3kWh बॅटरी पॅक दिले आहे. ज्यामुळे बॅटरी पॅक 176bhp पॉवर आणि 280Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 461 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते. तर दुसरीकडे या कारमध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ आणि पॉवर ड्रायव्हर सीट दिले आहे.
AUSW vs INDW: स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास, झळकावले शानदार शतक
तर सुरक्षेसाठी या कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, 6-एअरबॅग आणि ADAS तंत्रज्ञान देखील दिले गेले आहे. भारतीय बाजारात MG ZS EV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 18.98 लाख रुपये ते टॉप मॉडेलसाठी 25.75 लाख रुपये आहे. ही कार बाजारात Tata Nexon EV आणि Mahindra XUV 400 EV शी बाजारात आहे.
धक्कादायक, साताऱ्यात जामिनासाठी न्यायाधीशांनीच घेतली 5 लाखांची लाच, गुन्हा दाखल