Maruti Nexa Car Discount : मारुती नेक्साने मे महिन्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त ऑफर जाहीर केला आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही अगदी स्वस्तात तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करु शकतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती नेक्साने फ्रॉन्क्स, बलेनो, ग्रँड विटारा, इग्निस, एक्सएल6, इन्व्हिक्टो, सियाझ आणि जिमनी सारख्या कारवर भन्नाट ऑफर जाहीर केली आहे.
Maruti Grand Vitara
देशातील बाजारात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी मारुती ग्रँड विटारावर (Maruti Grand Vitara) कंपनीकडून जबरदस्त ऑफर जाहीर करण्यात आले आहे. कंपनीने या ऑफर अंतर्गत 70,000 रुपयांपर्यंत रोख सूट, 35,000 रुपयांपर्यंत वॉरंटी आणि 65,000 रुपयांपर्यंत स्क्रॅपेज बोनस समाविष्ट आहे. तर 2024 च्या पेट्रोल व्हेरियंट मॉडेलवर कंपनी 1.15 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. तर दुसरीकडे ग्रँड विटाराच्या 2025 च्या हायब्रिड मॉडेलवर 1.25 लाख रुपयांचे फायदे दिले जात आहेत, तर पेट्रोल व्हेरिएंटसाठी 60,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. भारतीय बाजारता या कारची किंमत 11.42 ते 20.52 लाख रुपयांपर्यंत आहे.
Maruti Invicto
तर दुसरीकडे कंपनी मारुती इन्व्हिक्टोच्या (Maruti Invicto) टॉप-स्पेक अल्फा+ व्हेरिएंटवर देखील 1.4 लाख रुपयांची सूट देत आहे. तर 7-सीट आणि 8-सीट कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असलेल्या झेटा+ व्हेरिएंटवर 1.15 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. बाजारात या कारची किंमत 25.51 ते 29.22 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
Maruti Jimny
लोकप्रिय कार मारुती जीमिनीवर देखील कंपनीकडून ऑफर देण्यात येत आहे. या महिन्यात कंपनी या कारवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. बाजारात या कारची किंमत 12.76 ते 14.81 लाख रुपयांदरम्यान आहे.
Maruti Fronx
मारुती जीमिनीसह मारुती फ्रॉन्क्स टर्बो व्हेरियंटवर देखील कंपनीकडून सूट देण्यात येत आहे. यामध्ये रोख सवलत आणि एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनससह 43,000 रुपयांच्या व्हेलॉसिटी एडिशन अॅक्सेसरीजचा समावेश आहे. 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आणि एएमटी गिअरबॉक्ससह येणाऱ्या फ्रॉन्क्स ट्रिम्सवर 35,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. तर मिड-स्पेक व्हेरिएंटवर 22,000 रुपयांपर्यंतची सूट ग्राहकांना मिळणार आहे. तर फ्रॉन्क्स सिग्मा आणि सीएनजी व्हेरियंटसह एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनसच्या स्वरूपात 15,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत.
तुर्की-अझरबैजानला पुन्हा धक्का, एलपीयूनंतर चंदीगड विद्यापीठानेही रद्द केला करार
मारुती फ्रॉन्क्सची किंमत 7.55 ते 12.91 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तरी देखील ऑफरबाबत कार खरेदीपूर्वी डीलरशी संपर्क साधून संपूर्ण माहिती घ्यावी कारण ऑफर वेगवेगळ्या शहरांसाठी वेगवेगळी असू शकते.