Download App

Tata- Mahindra ची धाकधूक वाढणार, मारुती लाँच करणार 3 जबरदस्त इलेक्ट्रिक कार

Maruti Suzuki Upcoming Electric Cars : देशात वाढत असणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) मागणी पाहता आता देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी

  • Written By: Last Updated:

Maruti Suzuki Upcoming Electric Cars : देशात वाढत असणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) मागणी पाहता आता देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) देखील भारतीय बाजारात तीन नवीन इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याची जोरदार तयारी करत आहे. पुढील 2-3 वर्षात कंपनी भारतीय कंपनीकडून नवीन इलेक्ट्रिक कार्स लाँच होण्याची शक्यता आहे.  कंपनी eVX, YMC MPV आणि eWX इलेक्ट्रिक कार्स बाजारात लाँच करण्याची तयारी करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Maruti Suzuki eVX

माहितीनुसार, भारतीय बाजारात मारुती सुझुकी 2025 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार Maruti Suzuki eVX लाँच करू शकते. माहितीनुसार, 17 ते 22 जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये कंपनी ही कार लाँच करू शकते. ग्राहकांना या कारमध्ये हाय-माउंट स्टॉप लॅम्प, शार्क फिन अँटेना आणि स्लो अँटेना मिळेल. तसेच यात 17-इंच अलॉय व्हील्स मिळतील. Suzuki eVX सिंगल आणि ड्युअल-इलेक्ट्रिक मोटर सेटअपमध्ये उपलब्ध असेल. माहितीनुसार ही कार तब्बल 500 किमीची रेंज देणार आहे.

Maruti Suzuki YMC MPV

Maruti Suzuki eVX कंपनी आपली पहिली MPV इलेक्ट्रिक कार Maruti Suzuki YMC MPV वर देखील कर असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय बाजारात ही कार 2026 च्या आसपास लाँच होऊ शकते. ही कार eVX मिडसाईज इलेक्ट्रिक SUV सारख्याच प्लॅटफॉर्मवर तयार होणार असून या कारमध्ये 60 kWh बॅटरी पॅक देण्यात येणार आहे ज्यामुळे ही कार देखील तब्बल 500 किमीची रेंज देऊ शकते.

Maruti Suzuki eWX  

गेल्या महिन्यात कंपनीने 2024 बँकॉक मोटर शोमध्ये eWX इलेक्ट्रिक कार सादर केली होती. माहितीनुसार या कारचे डिझाइन पेटंट भारतात दाखल झाले असून लवकर या कारवर काम सुरु करण्यात येणार आहे. Maruti Suzuki eWX मारुती वॅगनआरचे इलेक्ट्रिक मॉडेल असल्याचे सांगितले जात आहे.

मनोज जरांगे यांचे वादळ शांत होणार? मुख्यमंत्री शिंदे घेणार भेट

माहितीनुसार ही कार 3,395 मिमी लांब, 1,475 मिमी रुंद आणि 1,620 मिमी उंच असेल. तसेच फुल चार्जमध्ये ही कार 230Km पर्यंतची रेंज असणार आहे. भारतीय बाजारात ही कार 10 ते 12 लाखंदरम्यान लाँच होऊ शकते. त्यामुळे भारतीय बाजारात पुढील काही दिवसात Tata आणि Mahindra च्या इलेक्ट्रिक कार्सना स्पर्धे मिळणार आहे.

follow us

संबंधित बातम्या