पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. http://www.pmc.gov.in/ या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर या भरती विषयीची माहिती देण्यात आली आहे. या जाहिरातीत भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांसाठी शैक्षणिक अहर्ता, अर्ज कसा करावा, अर्ज करण्याची अंतिम तारीख, वेतन आणि वयोमर्यादा याबाबतचा सविस्तर सर्व तपशील दिला आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज बोलावण्यात आले आहेत. 28 मार्च पर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत. (Pune Municipal Corporation Recruitment 2023)
ही भरती रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक, पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, कंपाऊंडर या जागासाठी आहे. या भरतीद्वारे एकूण 320 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करतांना 10 वी, 12 वी चे प्रमाणपत्र, अन्य शैक्षणिक प्रमाणपत्रं याशिवाय, TC, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र आणि पासपोर्ट साईझ फोटो आदी कागदपत्रे अर्ज करतांना अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेली जाहीरात काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतरच अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर उमेदवारांकडून अर्जात काही त्रुटी राहिल्यास अर्ज रद्द होईल, याची नोंद अर्जकर्त्यांनी घ्यावी.
पदे –
रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट
वैद्यकीय अधिकारी
पशुवैद्यकीय अधिकारी
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक
स्वच्छता निरीक्षक
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
कंपाउंडर/औषध निर्माता
वर्गनिहाय पदे
एकून रिक्त पदांपैकी वर्ग I साठी 8
वर्ग II साठी 23
वर्ग III साठी 289 रिक्त आहेत.
शैक्षणिक अहर्ता –
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच 10 वी पर्यंत शिक्षणं घेतलेलं असावं
संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक
उमेदवारांनी पदभरती संदर्भातल्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक
पदांनुसार शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
Shirdi loksabha: आठवलेंना विखे-पवार वाद नडला, अपप्रचाराचा फटका !
वेतन –
पद आणि श्रेणीनुसार वेतन 19, 900 ते 2, 87, 500 एवढं असणार आहे.
वयोमर्यादा –
पुणे महानगरपालिकेनं जारी केलेल्या भरतीसाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी कमीत कमी वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 38 वर्ष असावं.
आरक्षित वर्गासाठी – 43,45 आणि 55 वर्षे
अर्ज शुल्क-
खुल्या प्रवर्गासाठी – 1000 रुपये
मागास प्रवर्गासाठी – 900 रुपये
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2023
● या पदभरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळ : http://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html