Mercedes G 580 : भारतीय बाजारात Mercedes-Benz नवीन वर्षात मोठा धमाका करणार आहे. कंपनी भारतीय बाजारात जानेवारी महिन्यात आपली सर्वात महागडी इलेक्ट्रिक कार (Electric Car) लाँच करणार आहे. बाजारात ही कार Mercedes G 580 नावाने लाँच करण्यात येणार आहे. सध्या या कारबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी 9 जानेवारी रोजी बाजारात ही इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.
Mercedes G 580 माहितीनुसार Mercedes G 580 ची डिझाइन जवळपास ICE सारखेच असणार आहे. या कारमध्ये लॅडर-फ्रेम चेसिस देण्यात येणार आहे. यात ब्लॅक फिनिशिंगसह क्लोज ग्रिल, राउडं एलईडी हेडलाइट आणि समोरील बाजूस डीआरएल युनिट असेल. तसेच या कारमध्ये ऑल-ब्लॅक अलॉय व्हील देखील पाहायला मिळू शकतात.
Mercedes-Benz to reveal Electric G 580, Concept CLA at Auto Expo 2025 https://t.co/jlmhIzFh33 pic.twitter.com/HAUfiSJHSe
— GaadiKey (@GaadiKey) December 24, 2024
तर दुसरीकडे या कारच्या इंटीरियरमध्ये ड्युअल-स्क्रीन सेटअपसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ड्रायव्हर डिस्प्ले कंपनीकडून ऑफर करण्यात येऊ शकते. हे 12.3 इंच स्क्रीनवर MBUX सिस्टिमसह येऊ शकते. जे Apple CarPlay आणि Android Auto सह उपलब्ध असेल. कनेक्टेड ॲपद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील या कारमध्ये असणार आहे. याच बरोबर वायरलेस चार्जिंग, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, बर्मेस्टर साउंड सिस्टम, इंटरटेन्मेन्ट स्क्रीन, ADAS तंत्रज्ञान आणि 360-डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स पाहायला मिळू शकतात.
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी हाफिज अब्दुल रहमान मक्कीचे निधन
Mercedes G 580 बॅटरी आणि रेंज
Mercedes G 580 कंपनी 116 kWh चा बॅटरी पॅक देणार आहे. ज्यामुळे ही कार एका चार्जवर 470 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देऊ शकते. या कारबाबत कंपनीकडून असा दावा करण्यात येत आहे की ही कार 30 मिनिटांत 0 टक्के ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. तसेच ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार केवळ 5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तासाचा वेग प्राप्त करू शकते.