मुलांनी Meta AI ला सांगितली आत्मXXची गोष्ट, तर आई-वडिलांना लगेच मिळणार Alert…

Meta AI Alert आजच्या डिजिटल युगात किशोरवयीन मुलं-मुली आपल्या मित्रांइतक्याच सहजपणे AI चॅटबॉट्सशी संवाद साधू लागली आहेत.

Meta AI Alert

Meta AI Alert

Meta AI Will Alert Parents If Teens Discuss Suicide Or Self Harm With Chatbot : आजच्या डिजिटल युगात किशोरवयीन मुलं-मुली आपल्या मित्रांइतक्याच सहजपणे AI चॅटबॉट्सशी संवाद साधू लागली आहेत. अभ्यास, करिअर, नातेसंबंध किंवा मानसिक तणाव अशा अनेक वैयक्तिक गोष्टी ते AI समोर मोकळेपणाने मांडतात. मात्र, या वाढत्या वापरासोबतच मुलांच्या मानसिक आरोग्याविषयी आणि ऑनलाइन सुरक्षिततेविषयीची चिंता देखील वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर Meta ने मुलांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे AI Safety Feature जाहीर केले आहे. या फीचरमुळे एखादा किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी Meta AI शी संवाद साधताना आत्महत्येचा (Suicide) किंवा स्वतःला इजा करण्याचा (Self-Harm) उल्लेख करत असल्याचे आढळल्यास, त्याची माहिती संबंधित पालकांना दिली जाणार आहे. या फीचरचा उद्देश मुलांच्या गोपनीयतेचा आदर राखत संभाव्य संकटाची वेळेत माहिती पालकांना मिळावी आणि योग्य वेळी हस्तक्षेप करता यावा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

नेमकं काय आहे नवीन फीचर?

यापूर्वी एखाद्या किशोरवयीन वापरकर्त्याने Meta AI शी बोलताना आत्महत्येसंदर्भात किंवा स्वतःला इजा करण्यासंदर्भात काही लिहिल्यास, AI त्याला केवळ मदतीसाठी हेल्पलाइनची माहिती देत असे. मात्र, आता Meta ने यात मोठा बदल केला आहे. AI ला जर संभाषणातून मुलगा किंवा मुलगी गंभीर मानसिक तणावात असल्याचा संशय आला, तर तो संवाद तपासणीसाठी पाठवला जाईल. त्यानंतर धोका असल्याची खात्री झाल्यास संबंधित पालकांना तातडीचा Parental Alert पाठवला जाईल. त्यामुळे पालकांना योग्य वेळी परिस्थितीची कल्पना मिळून आवश्यक पावले उचलता येतील.

AI बारीक संकेतही ओळखणार

हे फीचर बालसुरक्षा तज्ज्ञ आणि पालकांच्या सल्ल्याने विकसित करण्यात आले आहे. AI केवळ “मला आत्महत्या करायची आहे” अशा स्पष्ट वाक्यांवरच नव्हे, तर मानसिक तणाव, नैराश्य किंवा स्वतःला इजा करण्याचे सूचक संकेत असलेल्या संवादांचाही अभ्यास करेल. मात्र, चुकीचे निष्कर्ष निघू नयेत म्हणून AI च्या निर्णयावर थेट पालकांना सूचना पाठवली जाणार नाही. AI ने संशयास्पद संवाद ओळखल्यानंतर तो प्रथम ह्युमन रिव्ह्यू टीमकडून तपासला जाईल. त्यानंतरच पालकांना सूचना पाठवण्याचा निर्णय घेतला जाईल असे Meta ने स्पष्ट केले आहे.

गोपनीयता आणि सुरक्षिततेचा समतोल

Meta च्या या निर्णयाचे बालसुरक्षा तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. ConnectSafely चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी मॅगिड यांनी सांगितले की, किशोरवयीन मुलांना गोपनीयतेचा अधिकार आहे. मात्र त्यांच्या जीवाला धोका असल्याची शक्यता असेल, तर पालकांना त्याची माहिती मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. Meta ने गोपनीयता आणि सुरक्षितता यामध्ये योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतात कधी येणार?

सध्या हे AI Parental Alert फीचर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांमध्ये Instagram च्या Parental Supervision वापरणाऱ्या पालकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. Meta च्या माहितीनुसार, 2026 अखेरपर्यंत हे फीचर टप्प्याटप्प्याने जगभर सुरू केले जाणार असून, त्यामध्ये भारताचाही समावेश असेल. त्यानंतर भारतीय पालकांनाही आपल्या मुलांच्या ऑनलाइन मानसिक सुरक्षिततेवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे.

मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल

डिजिटल युगात किशोरवयीन मुले अनेकदा त्यांच्या भावना AI चॅटबॉट्सशी व्यक्त करतात. अशा परिस्थितीत गंभीर मानसिक संकटाची लक्षणे वेळेत ओळखून पालकांना सतर्क करण्याचा Meta चा हा प्रयत्न मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, गोपनीयता, पालकांची भूमिका आणि AI च्या अचूकतेबाबत पुढील काळातही चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे.

Exit mobile version