Download App

बापरे! Mobile App चोरताहेत तुमचा डेटा; Uninstall केल्यानंतरही सोडत नाहीत पिच्छा..

एकदा फोनमधून एखादे ॲप डिलिट केले की ताण मिटला असेच तुम्हाला वाटत असेल. पण असे काही नाही.

Tips and Tricks : एकदा फोनमधून एखादे ॲप डिलिट केले की ताण मिटला असेच तुम्हाला वाटत असेल. पण असे काही नाही असे बरेचसे मोबाईल ॲप (Mobile App) आहेत जे फोनमधून डिलिट केले तरी युजर्सचा महत्त्वाचा डेटा ॲक्सेस करू शकतात. ऐकून आश्चर्य वाटलं ना.. घाबरू नका टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला याबाबतीत खास माहिती देणार आहोत. फोनमधून ॲप डिलिट केले तरी हे अँप कशा पद्धतीने युजर्सचा डेटा चोरतात आणि ही चोरी तुम्हाला कशी रोखता येईल? याबाबत माहिती घेऊ या..

Google Play Store किंवा Apple App Store मधून ॲप डाउनलोड केल्यानंतर ॲप तुमचे कॉन्टॅक्ट, मेसेज, गॅलरीसहित अनेक परमिशन मागतात. जोपर्यंत तुम्ही अशी परमिशन देत नाही तोपर्यंत ॲप पुढे कामच करत नाहीत. त्यामुळे युजर परमिशन देऊन टाकतात. पण ज्यावेळी तुम्ही असे ॲप तुमच्या फोनमधून डिलिट करता किंवा uninstall करता तरीही या ॲपकडे तुमचा सर्व डेटा ॲक्सेस राहतो. मग या गोष्टी कळणार तरी कशा? कोणते ॲप डिलिट झाल्यानंतर सुद्धा तुमचा डेटा ॲक्सेस करत आहे या गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.

मोबाइल, क्रेडिट कार्ड विसराच.. चेहरा स्कॅन करून होणार पेमेंट; जाणून घ्या, Smile Pay सिस्टिम..

काय आहेत उपाय

सर्वात आधी मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा. यानंतर गुगल पर्यायावर क्लिक करा. यानंतर ऑल सर्व्हिसेसवर टॅप करा. यानंतर Connected Apps पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला अशा सर्व थर्ड पार्टी ॲप्सची माहिती कळेल ज्यांना तुम्ही डेटा शेअर केला होता. तुम्ही तुमच्या फोनमधून अनइंस्टॉल केलेल्या सर्व ॲप्सची लिस्ट देखील तुम्हाला येथे दिसेल.

हे ॲप जरी तुमच्या फोनमधून अनइंस्टॉल झालेले असले तरी तुमचा डेटा ॲक्सेस करू शकतात. मग अशा वेळी काय कराल? तर त्या अँपवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला Delete All Connections वर क्लिक करा. पुढील स्टेपमध्ये तुम्हाला Confirm वर टॅप करावे लागेल. अशाच पद्धतीने बाकीच्या अँपबाबतीत प्रोसेस करावे लागेल. अशा पद्धतीने तुम्ही अनइंस्टॉल केलेल्या अँपना डेटा चोरीपासून रोखू शकाल.

follow us