Download App

मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक प्राध्यापक, डेटा एंट्री पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

  • Written By: Last Updated:

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. मात्र, आजच्या प्रचंड स्पर्धेच्या काळआत सरकारी जॉब मिळवणं महाकठीण झालं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, जर तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आली आहे. ती म्हणजे, मुंबई पालिकेने सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor), डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.

World Cup 2023 : नाणेफेक जिंकून टीम इंडियाची फलंदाजी; रोहित शर्माचं तुफान 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार ऑफलाइन पद्धतीने भरतीसाठी अर्ज करू शकतात. मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी अर्जाची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – असिस्टंट प्रोफेसर, डेटा एंट्री ऑपरेटर

एकूण पदांची संख्या – 19

शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक प्राध्यापक – DM/DNB/MD/MS
डेटा एंट्री ऑपरेटर – पदवीधर, MS-CIT मराठी आणि इंग्रजी, टायपिंग काम, 6 महिन्यांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 38 ते 43 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांनी वयाच्या मर्यादेत सुट दिली आहे. त्यासाठी उमदेवारांनी संबंधित नोटिफिकेशन वाचावे.

Sanjay Raut : अजितदादा अन् शरद पवार सामन्यात विनर कोण? राऊत म्हणाले, निवडणुकीत.. 

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
डिस्पॅच विभाग, तळमजला,
टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायराची जी बिल्डिंग हॉस्पिटल,
मुंबई – 400008

आवश्यक कागदपत्रे
रिझ्युम (बायोडेटा)
10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना)
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 आणि 23 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाइट – https://www.mcgm.gov.in/

पगार –
सहाय्यक प्राध्यापक – 1 लाख रुपये प्रति महिना.
डेटा एंट्री ऑपरेटर – 15 हजार रुपये प्रति महिना.

या भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमदेवारांनी दिलेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. कारण, अर्ज करतांना अर्जामध्ये काही त्रुटी राहिल्यास अर्ज फेटाळल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

जाहिरात

https://drive.google.com/file/d/1s5KnpkVtXeZT4z_-HH6sKimRxJbHopeq/view

https://drive.google.com/file/d/1whDEQYsGN18QZihVkpXmo8GcHDv1XtQO/view

Tags

follow us