Sanjay Raut : अजितदादा अन् शरद पवार सामन्यात विनर कोण? राऊत म्हणाले, निवडणुकीत..

Sanjay Raut : अजितदादा अन् शरद पवार सामन्यात विनर कोण? राऊत म्हणाले, निवडणुकीत..

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आगामी निवडणुकांबाबत मोठं भाकित केलं आहे. 2024 च्या निवडणुकीत (Elections 2024) शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असा दावा राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मतदारसंघांची चाचपणी सुरू झालेली असतानाच राऊतांनी हे वक्तव्य केलं आहे. दिवाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्याचा दौरा करणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) दोघांचेही मैदान बारामती आहे. पण, शरद पवार बारामती जिंकतील. बारामतीच्या कुस्तीत शरद पवारच मैदान मारतील. महाराष्ट्रात शरद पवार यांचेच नेतृत्व असेल. भविष्यात दोनच नेते या राज्यात असतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण तुम्हाला यशस्वी झालेले दिसेल असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut : राम लल्ला आणि अयोध्या भाजपची मालकी नाही; भाजपच्या आश्वसनानंतर राऊतांचा हल्लाबोल

राऊत यांनी यावेळी दिवाळीनंतरच्या प्लॅनिंगचीही माहिती दिली.  दिवाळीनंतर उद्धव ठाकरे राज्यभरात दौरा करणार आहेत. दिवाळीनंतर याचा एक कार्यक्रम तयार केला जाणार आहे. राज्यात सर्व नेते फिरतील. या नेत्यांवर महाराष्ट्रातल्या विविध विभागांच्या संघटनात्मक जबाबदारी देण्यासंदर्भात लवकरच घोषणा होतील. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात नेत्यांवर अशा जबाबदाऱ्या दिल्या गेल्या होत्या. त्याच पद्धतीने जबाबदाऱ्या देण्यात येतील असे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंची एक कोटींची देणगी 

मध्य प्रदेशात पुन्हा भाजपाचे सरकार आल्यास भाविकांना राम मंदिराचे मोफत दर्शन घडविण्यात येईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपाचे हे प्रचार तंत्र आहे. करू द्या. राम मंदिराला विरोध असण्याचे काहीच कारण नाही. राम मंदिर प्रकरणात मी स्वतः सीबीआय न्यायालयात हजर राहिलो आहे. राम मंदिराच्या निर्मितीची घोषणा झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सर्वात आधी एक कोटी रुपयांची देणगी दिली होती.  त्यामुळे आता राजकारण कमी करा. रामाने बाण सोडला तर तुमचे राजकारण संपून जाईल, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut : ’11 तारखेला हिशोब होणारच!’ राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube