Sanjay Raut : राम लल्ला आणि अयोध्या भाजपची मालकी नाही; भाजपच्या आश्वसनानंतर राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : राम लल्ला आणि अयोध्या भाजपची मालकी नाही; भाजपच्या आश्वसनानंतर राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या निवडणुकीतील एका अश्वासनावरून जोरदार निशाणा साधला आहे. ही टीका त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्या मध्यप्रदेशामध्ये निवडणूक प्रचार करताना केलेल्या एका वक्तव्यावर केली आहे. तर भाजपच्या या अश्वासनामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालं आहे. एवढं नक्की

काय म्हणाले अमित शाह?

सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरू आहे. तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकांची पायाभरणी म्हणजे जानेवारीमध्ये आयोध्येतील राम मंदीरामध्ये प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्याचा वापर भाजपकडून निवडणुक प्रचारामध्ये केला जाणार हे स्पष्टच आहे. त्यात आता अमित शाह यांनी प्रचार सभेत जनतेला असं सांगितलेलं आहे की, मध्यप्रदेशच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला मत दिली, भारतीय जनता पक्षाचं सरकार आणलं तर मध्यप्रदेशच्या जनतेला अयोध्येत राम लल्लाचे दर्शन दिले जाईल. जर मत दिली नाही तर तुम्हाला पैसे भरावे लागेल.

Telangana Election: काँग्रेसचे उमेदवार जी विवेकानंद सर्वात श्रीमंत उमेदवार, किती संपत्ती वाचा ?

त्यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राम आणि अयोध्या हा तुमच्या मालकीचे आहे का ? सर्वांचे आहे.शब्द मागे घ्या आणि माफी मागा तुम्ही. मत न देणाऱ्यांना वेशीवर पाठवणार का? ही गंभीर बाब आहे. त्या बाबत हिंदू संघटनेने दखल घेतली पाहीजे. अनेक राज्यात आम्ही निवडणुका लढवल्या आणि आम्ही आमचा प्रचार केला.

…म्हणून Elon Musk ने मागितली पियूष गोयल यांची माफी

तसेच ते म्हणाले की, भाजपकडे कोणी ठेका दिला आहे. बच्चा बच्चा राम बोलेगा? महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपची युती असताना आम्ही दोघांनी एकत्र प्रचार केला. पण महाराष्ट्राबाहेर आम्हाला कधीही युतीमध्ये सामावून घेतले नाही. त्यामुळे आम्ही आमचे उमेदवार उभे केले आणि त्यामुळे आम्ही आमचा स्वाभिमानाने प्रचार केला. तसेच त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीवरूनही टीका केली.

आता जे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पैसे हे आमदार खासदार सहाय्यता निधीमध्ये वळवले जाते. खोक्यामध्ये आणि ती सहाय्यता निधी घरी पोहोचवले जाते खोक्यामध्ये सरकार टिकवण्यासाठी. आरोग्य विषयक निधी आता मिळत नाही. खाजगी कामासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी वळवला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे व्यापक धोरण आहे. अशा शब्दांत राऊतांनी भाजपला सुनावले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube