Download App

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरू, महिन्याला 2,80,000 पगार, ‘या’ तारखेपर्यंतच करू शकता अर्ज

  • Written By: Last Updated:

Mumbai Metro Rail Corporation Limited Job : मुंबई मेट्रोमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने व्यवस्थापक आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार MMRCL च्या अधिकृत वेबसाइट mmrcl.com वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (Mumbai Metro Rail Corporation Recruitment Start Salary 280000 per month)

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 21 जून 2023 रोजी सुरू झाली असून तुम्ही 1 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 22 पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाईल.

पदांचा तपशील
महाव्यवस्थापक: 1 पद
सि. डेप्यूटी व्यवस्थापक: 2 पदे
उपव्यवस्थापक: 2 पदे
सहाय्यक व्यवस्थापक: 7 पदे
उपअभियंता: 1 पद
पर्यावरण शास्त्रज्ञ: 1 पद
पर्यवेक्षक (ऑपरेशन सेफ्टी) : 1 पदे
पर्यवेक्षक (साहित्य व्यवस्थापन) : 1 पदे
कनिष्ठ अभियंता-II (ट्रॅक): 4 पदे
प्रकल्प सहाय्यक (वित्त): 2 पदे

अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण

वयोमर्यादा –
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा पदानुसार 55/50/40/36 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार सवलत दिली जाईल.

किती पगार मिळेल?
निवडलेल्या उमेदवारांना पोस्टनिहाय रु. 34,020 ते रु 2,80,000 दिले जातील.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 1 ऑगस्ट 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
येथे अर्ज सबमिट करा
उपमहाव्यवस्थापक (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051.

जाहिरात – https://mmrcl.com/sites/default/files/Advt.%202023-01-%20Website%20Copy%20Rev.pd

निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांना त्यांच्या पात्रता/ संबंधित क्षेत्रातील अनुभवाच्या आधारावर मुलाखतीसाठी निवडले जाईल. अधिक तपशीलांसाठी उमेदवार एमएमआरसीएलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Tags

follow us