अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण
Govt. Schemes : राज्यातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास वृद्धीसाठी वैयक्तिक लाभाची योजना सुरु करण्यात आली आहे.(maharashtra provide training in animal husbandry to scheduled caste beneficiaries Govt. Schemes)
‘वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल’; अजितदादांना अर्थखातं देण्यावरुन गुलाबरावांचे मोठे विधान
योजनेसाठी अटी :
प्रशिक्षण कालावधी 3 दिवसांचा राहील.
प्रशिक्षणासाठी अर्जदारास जनावरांच्या प्रक्षेत्रावर, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, शेळी मेंढी विकास महामंडळ, भारतीय कृषि औद्योगीक प्रतिष्ठान, कृषि व पशुवैद्यकीय महाविद्यालय या ठिकाण अथवा प्रक्षेत्रावर प्रशिक्षण घेणे शक्य नसल्यास इतर ठिकाणी सोईनूसार प्रशिक्षणास उपस्थित रहावे लागेल.
प्रशिक्षणार्थींना प्रक्षेत्रावरच प्रात्यक्षिक काम करावे लागेल.
यात प्रक्षेत्रावरील गायी म्हशीचे व्यवस्थापन यामध्ये मुख्यत: संकरीत पैदाशीचे, तंत्रज्ञान, ऋतूचक्र, माज ओळखणे, कृत्रिम रेतन, गाभण गाई/ म्हशींची निगा, जन्मलेल्या वासरांचे संगोपन, खाद्य-वैरणीचे प्रकार व उत्पादन तंत्रज्ञान, दुग्धस्पर्धा स्वच्छ दुग्धोत्पादन, जनावरांना होणारे रोग व त्यानूसार रोगप्रतिबंधक लसीकरण, औषधोपचार,सहकारी संस्थेचे सभासदत्त्व इ. बाबतची माहिती घ्यावी लागेल.
शेळयांमध्ये संकरीत पैदास, जन्मलेल्या करडाची जोपासना, नर विक्री बाबत बाजार व्यवस्था व शेळीपालन प्रकल्प अर्थशास्त्र याबाबतची माहिती घ्यावी लागेल.
प्रशिक्षणार्थींना प्रगतीशील शेतकऱ्यांकडे सहल / बचत गटांना भेटी देणे, त्यानूसार त्यांचेकडील जनावरांच्या जोपासनेबाबत प्रात्यक्षिक पहाणे. जवळच असलेली प्रक्षेत्रे दुधमहासंघ, शेळया मेंढयाचे प्रक्षेत्रे यांना भेटी देणे आवश्यक आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल…
लाभाचे स्वरूप :
प्रशिक्षण कालावधीत एका लाभार्थीवर रु.1,००० /- मर्यादेपयंर्तचा खर्च खालीलप्रमाणे-
लाभार्थ्यांना चहा, नाष्टा जेवण 300 (रु.100/- प्रतिदिवस)
जाण्या येण्याचा खर्च (एसटी / रेल्वे तिकीट पाहुन) :100/-
पेन, नोंदवही, छापील तांत्रिक माहिती :100/-
दृकश्राव्य व्यवस्था प्रचार, बॅनर्स, चार्टस (ट्रेनिंग एड मटेरीयल अंतर्गत) प्रशिक्षणार्थी बैठक व्यवस्था हॉल इ. अनुषंगिक खर्च : 500/-
एकुण : 1000/-
आवश्यक कागदपत्रे :
लाभार्थीं निवडताना संबंधीत ग्रामपंचायतीची शिफारस प्राप्त करून घेणे बंधनकारक राहील
फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
संपर्क कार्यालयाचे नाव :
पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त