राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल…

राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल…

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. त्यामुळे राज्यपाल व महामहिम राष्ट्रपती यांनी यात हस्तक्षेप करुन राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

Ahmednagar: गौतमी पाटील अन् सुजय विखे पाटलांसमोर चिमुरडीने केलं मार्केट जाम! पाहा व्हिडिओ

नाना पटोले म्हणाले की, राज्यात सध्या तमाशा सुरु असून महाराष्ट्राचा तमाशा करण्याचे हे पाप भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक करत आहे. भाजपाने महाराष्ट्राला कलंक लावला असून शाहु, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज कुठे नेऊन ठेवला आहे? असा प्रश्न पडला आहे. राज्यात सध्या जे सुरु आहे ते महाराष्ट्राला भूषणावह नाही. राज्यातील सरकार अस्थिर असून हे सरकार कधी जाईल हे सांगता येत नाही. मलईदार खाती कोणाला मिळावीत यासाठी मारामारी सुरु आहे. कोणाला कोणते खाते मिळावे यात राज्यातील जनतेला स्वारस्य नाही. केंद्रातील भाजपा सरकार ईडी, सीबीआयची भिती दाखवून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

शिंदे गटाचा विरोध डावलून भाजप राज्याच्या तिजोरीची चावी दादांकडेच देणार, खाते वाटपाचा तिढा सुटणार?

तसेच राज्यातील काही भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत तर काही भागात दुबार पेरणीचे संकट आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर करुनही ती मिळालेली नाही. कृषी मंत्री बोगस पथक पाठवून लुटण्याचे काम करत आहेत. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, महागाई, बेरोजगारी, जनतेच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्ष बोलत नाहीत, जनतेला वाऱ्यावर सोडून देण्यात आलेले आहे. काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशानात सरकारला जाब विचारेल, असेही ते म्हणाले.

फक्त 20 लाखांमध्ये भारतात मिळणार टेस्लाची कार; भारतातच लागणार प्लांट

भाजपने महाराष्ट्राला कलंक लावला असून आम्ही दुसऱ्यांसारखं व्यक्तीला कलंकक म्हणणार नाही तर पक्षानेच महाराष्ट्राला कलंक लावला आहे. राज्यात अस्थिर सरकार आहे, राज्यात शेतकरी सुखी आहे का? कायदा सुव्यवस्था आहे का? यामागे कोण होता? हे अनेकदा आम्ही विचारले, लोकं भयभीत आहे, लोकं प्रश्न विचारत आहेत. भाजपचे कार्यकर्ते यांची काय परिस्थिती आहे हे त्यांना विचारा, नागपूरातच याचे उत्तर मिळणार असल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.


टोमॅटोच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्रानं उचललं पाऊल! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यातून टोमॅटो खरेदी करणार

जनतेचे पैसे लुटायचे आणि त्यातून इव्हेंट करायचे हे सुरू आहे भाजपचे काम सध्या सुरु असून फुकटच्या बोंबा करणाऱ्यांकडे काँग्रेस लक्ष देत नाही. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जाण्यासाठी लोकं तयार नाहीत, जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. जनतेच्या प्रश्नाचं उत्तर भाजपला द्यावं लागणार आहे. भाजपच्या आरोपाकडे काँग्रेस लक्ष देणार नाही, काँग्रेस फुटणार नसल्याचं त्यांना ठणकावून सांगितलं आहे. देश विकून देश चालवण्याचं काम सुरु असल्याचं म्हणत पटोले यांनी टीका केली आहे. भाजपकडून महाराष्ट्र विद्रुप करणे सुरू असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यातील एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच विधीमंडळात ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील, त्या पक्षाचे विरोधी पक्षनेते होते, त्यामुळे दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद मिळणार असल्याचा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube