Ahmednagar: गौतमी पाटील अन् सुजय विखे पाटलांसमोर चिमुरडीने केलं मार्केट जाम! पाहा व्हिडिओ

Ahmednagar: गौतमी पाटील अन्  सुजय विखे पाटलांसमोर चिमुरडीने केलं मार्केट जाम! पाहा व्हिडिओ

Gautami patil: गौतमी पाटीलचा (Gautami patil) कार्यक्रम झाला आणि त्याची चर्चा झाली नाही असं होणार नाही. आता गौतमीच्या अहमदनगरमधील (Ahmednagar) कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरु असल्याचे ऐकायला मिळत आहे. (Social media) ऑर्केस्ट्रा आणि डिजे डान्सर असलेल्या गौतमी पाटीलचे नाव राज्यभरात घराघरात पोहचले आहे.

अकोलेनेर येथे झालेल्या या कार्यक्रमात गौतमीपेक्षा चर्चा झाली ती एका चिमुरडीची. या कार्यक्रमाला खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) देखील उपस्थित होते. गौतमीच्या डान्स कार्यक्रमांनी तुफान गर्दी होत आहे. सिनेसृष्टीतील एखाद्या कलाकाराची जितकी क्रेझ नसते, तितकी गौतमीची पाहायला मिळत आहे.

पारंपारिक लावणी कलेला आधुनिक साज चढवत ती सादर करत असल्याने तिच्या कार्यक्रमांना केवळ तरुण वर्गच नव्हे तर मुली आणि महिलाही मोठ्या हजेरी लावत आहेत. अशा या ‘सबसे कातील … गौतमी पाटीलचा’ ऑर्केस्ट्रा नुकताच नगर तालुक्यातील अकोळनेर या गावात पार पडला.

गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की गर्दी आणि राडा असे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र खेडमधील गौतमीचा कार्यक्रम कोणत्याही मोठ्या घटनेशिवाय पार पडला. यावेळी तरुणाईसह महिला, तरुणी, चिमुकल्यांनीही गौतमीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गौतमीच्या आदाकारीला भरभरुन प्रतिसाद दिला.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

गौतमीच्या डान्सचे कार्यक्रम आता राज्यभर होताहेत. सोशल मीडियावरही गौतमी पाटील हे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. आपल्या गावातील युवावर्ग, मुली, महिला व ग्रामस्थांना सध्या राज्यभर गाजत असलेल्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम आपल्या गावातच पाहायला मिळावा, या उद्देशाने गावात आयोजित करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube