फक्त 20 लाखांमध्ये भारतात मिळणार टेस्लाची कार; भारतातच लागणार प्लांट

फक्त 20 लाखांमध्ये भारतात मिळणार टेस्लाची कार; भारतातच लागणार प्लांट

Tesla Factory In India:  इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला भारतात प्रवेश करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. याबाबत टेस्ला भारत सरकारशी चर्चा करत असून टेस्लाला भारतात स्थानिक कारखाना सुरू करण्याची परवानगी हवी आहे. टेस्लाच्या या धोरणात्मक वाटचालीमागील कंपनीचा हेतू हा आहे की ती भारतात इलेक्ट्रिक वाहने तयार करू शकते आणि त्यांना परवडणाऱ्या किमतीत पुरवू शकते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली आहे. टेस्लाची भारतात 5 लाख इलेक्ट्रिक वाहने बनवण्याची योजना आहे, ज्यांची किंमत 20 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. जर ही योजना पूर्ण झाली, तर भारताच्या उदयोन्मुख इलेक्ट्रिक वाहन बाजाराला यामुळे मोठी चालना मिळू शकते. स्थानिक उत्पादनाद्वारे, परवडणाऱ्या किमतीत कारचे उत्पादन करण्याचे टेस्लाचे उद्दिष्ट आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

खरं तर, टेस्लाला इंडो पॅसिफिक प्रदेशात असलेल्या देशांमध्ये आपला व्यवसाय वाढवायचा आहे. यामुळेच टेस्लाने भारतात येण्यास होकार दिला आहे. लवकरच चीनसोबत भारत देखील टेस्ला वाहनांचा प्रमुख निर्यातदार म्हणून उदयास येऊ शकतो.

दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु पण.., प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान…

याबाबत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय टेस्लाशी चर्चा करत असल्याची आहे. टेस्लाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. जूनमध्ये, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क म्हणाले होते की कंपनी लवकरात लवकर भारतात येईल. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube