टोमॅटोच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्रानं उचललं पाऊल! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यातून टोमॅटो खरेदी करणार
Tomato High Prices : देशभरात टोमॅटो(Tomato) चांगलाच भाव खाताना पाहायला मिळतोय. उत्तर भारतात पावसानं एकच हाहाकार माजवला आहे. त्या भागातील शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरांत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातल्यात्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो टोमॅटोसाठी 140 ते 150 रुपये मोजावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक मास्टरप्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता टोमॅटोचे दर कमी होण्याची शक्यता आहे.(tomato high prices central government masterplan Will buy tomatoes from Maharashtra Karnataka Andhra Pradesh)
खासदार विखेंकडून पवारांवर जहरी टीका, म्हणाले, उद्धव ठाकरेंसारखाच…
केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (National Agricultural Cooperative Marketing Federation) अर्थातच नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संस्थेची मदत घेतली आहे. या संस्थांच्या माध्यमातून सुरुवातीला दिल्ली-एनसीआर भागातील ग्राहक विक्री केंद्रांच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘संजय राऊतांचा बळी गेला, सांगितलं तेच त्यांना बोलावं लागतं’; गोऱ्हेंनी सांगितलं ‘ते’ सत्य
त्यासाठी केंद्र सरकारकडून आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र येथून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, येत्या शुक्रवारपासून दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून टोमॅटोचे अनुदानित किंमतीत वितरण केले जाणार आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 14 जुलैपासून टोमॅटो दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून कमी दराने मिळतील. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) यांच्याकडे टोमॅटो खरेदीचे काम सोपवण्यात आले आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी किरकोळ किंमती गेल्या एका महिन्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहेत, अशा ठिकाणी कमी किंमतीत टोमॅटोचे वितरण केले जाईल.
देशातील विविध भागांमध्ये टोमॅटोचे दर प्रतिकिलो 200 रुपयांच्याही पुढे गेले आहेत. घाऊक मंडईमध्येही त्याचा दर 150 ते 180 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. व्यापाऱ्यांच्या मते गेल्या पंधरवड्यात बाजारात टोमॅटोचे दर चारपटीने वाढले आहेत. गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रामधील टोमॅटो उत्पादक भागामधून मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रामधील सातारा, नारायणगाव, तसचे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर पट्ट्यातून टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्येही टोमॅटोचे पिक निघणार आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेशमधील काही भागांमधून येत्या काही दिवसात नवीन टोमॅटोचं पिक हाती येणार आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरात मोठी घसरण होण्याची दाट शक्यता आहे.