‘संजय राऊतांचा बळी गेला, सांगितलं तेच त्यांना बोलावं लागतं’; गोऱ्हेंनी सांगितलं ‘ते’ सत्य

‘संजय राऊतांचा बळी गेला, सांगितलं तेच त्यांना बोलावं लागतं’; गोऱ्हेंनी सांगितलं ‘ते’ सत्य

Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी नुकताच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दलही धक्कादायक खुलासा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

गोऱ्हे म्हणाल्या, संजय राऊत यांनी मला खूप मदत केली आहे. माझ्या प्रत्येक आमदारकीच्या वेळेला त्यांनी शब्द टाकला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं लिखाणही खूप चांगलं असतं. ते जे बोलतात. शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून ते बोलतात त्यावेळी त्यांना जे सांगितलं जातं तेच ते बोलतात. ज्यांना आक्रमक बोलायचं नाही पण आक्रमक बोलणारा माणूस हवा आहे असं म्हणून संजय राऊतांकडे ती भूमिका आली. यामध्ये संजय राऊतांनाही खूप त्रास झाला. मला असं वाटतं की या सगळ्यात संजय राऊतांचा बळी गेला आहे.

हनी ट्रॅपमध्ये अडकलं निर्मला सीतारमण यांचं अर्थ मंत्रालय; पाकिस्तानला शेअर झाली गोपनीय माहिती?

ते जे काही बोलतात ते पक्ष सांगेल तेच ते बोलत असतात असं मला वाटतं. संजय राऊतांना अटक झाली. त्यांना धमक्या येत आहेत यामुळे त्यांना त्रास झाला. पण, त्यांना इतकं आक्रमक बोलण्याची गरजच काय आहे. तुमचे वैचारिक मतभेद आहेत ते एकमेकांसमोर व्यवस्थिपणे मांडा. पण त्यासाठी एकमेकांनी वेगवेगळी नावं द्यायची नाट्यमय काहीतरी करून ठेवायचं त्यामुळे तेढ वाढते बाकी काही नाही, असे गोऱ्हे म्हणाल्या.

गोऱ्हे या उद्धव ठाकरे गटाच्या एकनिष्ठ म्हणून ओळखल्या जात होत्या. पक्षातील प्रमुख महिला नेत्या म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तसेच त्याआधी भाजपबरोबर युती तुटल्यानंतरच्या काळात त्यांनी ठाकरे गटाची बाजू समर्थपणे सांभाळली होती. विधानपरिषदेतील उपसभापती म्हणूनही त्यांचे काम चांगले चालले होते. असे असतानाही त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला.

अजितदादांसोबत गेलेल्या संजयमामांना टक्कर देणार पवारांचा शिलेदार; मोठी शक्ती उभी करण्याचा निर्धार

काही दिवसांपासून नीलम गोऱ्हे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांत वादाची स्थिती निर्माण झाली होती. विधानपरिषदेत गोऱ्हे या उपसभापती असूनही बोलू देत नाहीत अशी तक्रार ठाकरे गटातील आमदारांची होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube