Download App

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये वरिष्ठ उपसचिव पदासाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार २० हजारांहून अधिक पगार, कोण करू शकतो अर्ज?

  • Written By: Last Updated:

Mumbai Port Trust Bharati 2023 : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. पण, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust) मुंबई येथे वरिष्ठ उपसचिव पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबद्दल तपशीलवार माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना http://www.mumbaiport.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पदाचे नाव – वरिष्ठ उपसचिव

एकूण पदांची संख्या – 3

शैक्षणिक पात्रता –
संबंधित क्षेत्रातील पदवी ( शैक्षणिक पात्रतेसाठी पदाच्या आवश्यकतेनुसार भरतीची मूळ जाहिरात पहा.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – ४२ वर्षे
प्रवर्गानुसार वयात सूट देण्यात आली आहे. त्यानुसार एससी/एसटी प्रवर्गासाठी ५ वर्षे आणि ओबीसींसाठी ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

आवश्यक कागदपत्रे
बायोडाटा, 10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना)
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी, मुंबई बंदर प्राधिकरण, बंदर भवन, जीआर मजला, एस.व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाइट –
http://www.mumbaiport.gov.in

पगार –
भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना 16 हजार रुपये ते 20 हजार 800 रुपये प्रति महिना पगार मिळेल.

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/124zjHswbYlXPfP-FhU06FLr2oosfsH4-/view

Tags

follow us