Download App

नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनमध्ये बारावी पास ते पदवीधारकांसाठी बंपर भरती, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

  • Written By: Last Updated:

National Seeds Corporation Recruitment 2023 : नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनने (National Seeds Corporation) काही पदांसाठी भरती काढली आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ अधिकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 89 जागा भरल्या जातील. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरणं 28 ऑगस्टपासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे स्थान याबद्दलची तपशीलवार माहिती अधिकृत नोटिफिकेशमध्ये देण्यात आली आहे.

यात कनिष्ठ अधिकारी 6 पदे, प्रशिक्षणार्थी 17 पदे, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी 66 पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन भरतीसाठी अर्ज करताना 10वी, 12वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यासारखी कागदपत्रे जोडावीत.

नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनमधील या भरतीसाठी राखीव श्रेणीतील उमेदवारांना सरकारी निकषांनुसार वयात सवलत दिली जाते. तपशील विवरणपत्रात दिलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. कारण अर्जात त्रुटी आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.

एकूण रिक्त पदे – 89

पदाचे नाव आणि शाखा –
कनिष्ठ अधिकारी – लीगल, विजिलेंस, मार्केटींग
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी- मार्केटींग, इलेक्ट्रिकल इंजिनीअर, सिव्हील इंजिनीअर.

शैक्षणिक पात्रता
लीगल – कायद्यातील पदवी + 1 वर्षाचा अनुभव.

विजिलेंस – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 5 वर्षांचा अनुभव.

मार्केटींग –
60 % गुणांसह कृषी पदवी + मार्केटींग /कृषी. बिजनेस व्यवस्थापन मध्ये एमबीए किंवा मार्केटींग /अॅंग्री. बिजनेस मॅनेजमेंट डिग्री/डिप्लोमा किंवा कृषी क्षेत्रातील पीजी पदवी.

इलेक्ट्रिकल अभियंता –
60% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनीअरिंग पदवी + एमएस ऑफिस

इस्रोची Aditya-L1 सूर्य मोहीम कशी असणार ? वाचा ए टू झेड माहिती 

सिव्हिल इंजिनीअर –
60% गुणांसह सिव्हिल शाखेतील इंजिनीअरिंग पदवी + एमएस ऑफिस.

कृषी – 60 % गुणांसह कृषी पदवी + एमएस ऑफिस.

मार्केटींग- 60 % गुणांसह कृषी विषयातील पदवी + एमएस ऑफिस.

गुणवत्ता नियंत्रण – 60 % गुणांसह कृषी विषयातील पदवी + एमएस ऑफिस.

स्टेनोग्राफर – 60 % गुणांसह कृषी पदवी + एमएस ऑफिस.

Agri Store –
60% गुणांसह 12वी पास + ऑफिस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा + स्टेनोग्राफी किंवा 60% गुणांसह पदवी + इंग्रजी शॉर्टहँड 80 श. प्र. मि. + संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र. मि.

वयोमर्यादा-
कनिष्ठ अधिकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी – 18 ते 30 वर्षे.
प्रशिक्षणार्थी – 18 ते 27 वर्षे.
ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट.

अर्ज शुल्क –
ओपन/ओबीसी/माझी सैनिक/ईडब्ल्यूएस रु.500.
OBC/PWD साठी कोणतेही शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाइट – https://www.indiaseeds.com/

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1tPEnS5SnsD8XWyO1Exrf4oG7EQFg6Hoy/view

Tags

follow us