Download App

नवी मुंबई महानगरपालिकेत मिळवा नोकरी, परीक्षेचं टेन्शन नाही, थेट मुलाखत; पगार 75,000

Navi Mumbai Municipal Corporation job : प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे फार कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) लवकरच काही पदांची भरती करणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमियोलॉजिस्ट या पदांसाठी आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 12 जुलै 2023 असेल.

(Navi Mumbai Municipal Corporation Recruitment for Various Posts No Exam Direct Interview Salary 75000)

एकूण जागा – 8

कोणत्या पदांसाठी भरती?
वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

1. वैद्यकीय अधिकारी – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार एमबीबीएस पर्यंतच शिक्षण पूर्ण केलेले असावे.

2. मायक्रोबायोलॉजिस्ट – संबंधित पदांनुसार उमेदवारांचे एमडी मायक्रोबायोलॉजिस्ट पर्यंतचे शिक्षण असावे.

3. एपिडेमियोलॉजिस्ट – संबंधित पदांनुसार उमेदवारांचे शिक्षण वैद्यकीय पदवीपर्यंत असावे.

कर्डिलेंनी फार तर फार सरपंचपदाबाबत बोलावं; थोरातांवर केलेल्या टीकेवरून तनपुरेंचा खोचक टोलापगार

वैद्यकीय अधिकारी – रु.60,000/- प्रति महिना

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – रु. 75,000/- दरमहा

एपिडेमियोलॉजिस्ट – रु. 35,000/- दरमहा

वयोमर्यादा –
उच्चतम वयोमर्यादा 70 वर्ष

आवश्यक कागदपत्रे –
बायोडेटा, 10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना) आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, जन्माचे प्रमाणपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र आवश्यक.
उमेदवाराचे नाव बदलले असेल तर नाव बदलसाठी उमेदवाराने विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्रातील प्रत सादर करावी.

अटी-
1. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.
2. सदरची पदे ही कंत्राटी स्वरुपाची आहेत. नियुक्तीचा कालावधी हा ६ महिन्यांचा आहे.
3. जाहिरातीमधील विहित पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज किंवा चुकीचे भरलेले अर्ज, वय शैक्षणिक अर्हता, गुणपत्रक या संदर्भात आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या स्व-साक्षांकित प्रती नसलेले अर्ज अपात्र समजले जातील.
4. मुलाखतीस येणाऱ्य़ा उमेदवाराने मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
5. यापूर्वी सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

मुलाखतीची दिनांक – 12 जुलै 2023 (सकाळी 10 ते दुपारी 3)

मुलाखतीचा पत्ता-
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, सेक्टर 15 ए, नवी मुंबई महानगरपालिका, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1ZDvMNo_n4_NJ7EDy9GdPCjoML_P8jGl5/view?pli=1

Tags

follow us