कर्डिलेंनी फार तर फार सरपंचपदाबाबत बोलावं; थोरातांवर केलेल्या टीकेवरून तनपुरेंचा खोचक टोला

कर्डिलेंनी फार तर फार सरपंचपदाबाबत बोलावं; थोरातांवर केलेल्या टीकेवरून तनपुरेंचा खोचक टोला

Prajakt Tanpure : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये काही राजकीय नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले आहेत. याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर निशाणा साधला जात आहे. यातच भावी मुख्यमंत्री पदावरून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी बाळासाहेब थोरातांची (Balasaheb Thorat) खिल्ली उडवली होती. यावर आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कर्डिले यांनी फार तर फार सरपंचपदाबाबत बोलावे, असा खोचक टोला तनपुरे यांनी लगावला आहे. (Prajakt Tanpure on Shivaji Kardile Kardile should only talk about the sarpanch post)

आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अहमदनगरमध्ये माध्यमांशी संवाध साधला. यावेळी बोलताना तनपुरे यांना कर्डिले यांनी भावी मुख्यमंत्री पदावरून विरोधकांवर तसेच बाळासाहेब थोरातांवर केलेल्या टीकेविषयी विचारण्यात आले. यावर बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांची खिल्ली उडवत उपरोधी टीका केली. ते म्हणाले, कर्डिले यांनी फार तर फार एखाद्या गावच्या सरपंचावर बोलावं किंवा जिल्हा बँकेच्या चेअरमन पदापर्यंत बोलावं. मुख्यमंत्री पदाविषयी तुम्ही कुणाची प्रतिक्रिया विचारता. एकदाचं विखे पाटलांना विचारलं असतं तर चाललं असतं. पण, मुख्यमंत्रीपदाविषयी तुम्ही कोणाला विचारताय? असा टोमना तनपुरे यांनी कर्डिले यांना लगावला.

तुमच्या अनागोंदी कारभाराच्या फायली तयार; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंना इशारा 

कर्डिले नेमकं काय म्हंटले होते ?
कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे श्रीरामपुर तालुक्यात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. यामुळं राकीय वर्तुळात चर्चांना उधन आलं होतं. दरम्यान, यावर बोलतांना कर्डिले यांनी प्रतिक्रिया देत थोरातांवर निशाणा साधला होता. ज्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर तसेच पोस्टर लागले आहेत, ते पुन्हा एकदा निवडून येतील की नाही याची खात्री नाही. मुख्यमंत्री म्हणून आपली घोषणा करायची आणि असं करून आपल्याला काही मत मिळतील का? आपण पुन्हा एकदा आमदार होऊ की काय, एवढ्यासाठी हे स्वप्न पाहण्याचे काम या नेत्यांकडून सुरू असल्याचं कर्डिलेंनी सांगितलं.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube