Download App

GPS ची होणार सुट्टी! इस्त्रोची NavIC टेक्नॉलॉजी मिळणार प्रत्येक स्मार्टफोनमध्ये, सरकारचा मोठा निर्णय

  • Written By: Last Updated:

NavIC Updates : GPS हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. जीपीएसशिवाय घरी फूड डिलिव्हरी जलद होणार नाही, वाहने रस्ता चुकतील, इतकं आपण जीपीएसवर अवलंबून आहोत. यूएस-विकसित जीपीएस प्रणाली मोबाइल फोन आणि जवळजवळ सर्व वाहनांचा अविभाज्य भाग बनली आहे. अशातच भारत सरकारने 5G स्मार्टफोन्सबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळं देशात लॉंच होणाऱ्या सर्व 5 जी स्मार्टफोनमध्ये कंपन्यांना मेड इन इंडिया नेव्हिगेशन सिस्टम NavIC ला सपोर्ट द्यावा लागेल. यासाठी NavIC चिसपेटचा वापर करावा लागेल.

NavIC प्रणाली म्हणजे काय?

NavIC म्हणजे Navigation with Indian constellation त्याचा सर्वसाधारण अर्थ भारतीय उपखंडातील दिशादर्शन असा घेतला जाऊ शकतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ही प्रणाली स्वतंत्रपणे विकसित केली आहे. जीपीएस प्रणाली कार्य करते त्याचप्रमाणे NavIC भारतीय उपखंडातही प्रभावीपणे काम करत आहे. NavIC कार्यान्वित करण्यासाठी एकूण आठ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. प्रकल्पावर काम 2006 मध्ये सुरू झाले आणि 2011 पासून टप्प्याटप्प्याने उपग्रह प्रक्षेपित केले गेले. 2018 मध्ये, NavIC मार्गदर्शन प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाली.

Dono: ‘दोनों’चा ट्रेलर रिलीज होताच राजवीर झाला भावुक; म्हणाला, ‘माझ्यासाठी…’ 

फोनमध्ये NavIC कधी उपलब्ध होईल?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुरुवारी सांगितले की स्मार्टफोन कंपन्यांना 1 जानेवारी 2025 पासून NavIC सपोर्ट प्रदान करावा लागेल. तर L1 बँडमध्ये काम करणारे अन्य फोन जे सध्या ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम म्हणजे, जीपीएसवर चालतात. त्या डिवाईसमध्ये 1 डिसेंबर 2025 पर्यंत इंडियन नेव्हिगेशनचा सपोर्ट देणं अनिवार्य असेल. सरकारच्या मते, यामुळे स्वदेशी सेवांना चालना मिळेल. नॅव्हिगेटर नेव्हिगेशन सध्या ऑटोमोबाईलमध्ये वापरले जात आहे

डिव्हाइसची किंमत वाढू शकते

सरकारच्या या निर्णयावर उपकरण उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे. उत्पादकांच्या मते, स्मार्टफोनला NavIC सपोर्ट जोडल्याने उत्पादन खर्च वाढू शकतो, त्यामुळं डिवाइस महाग होतील. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर ह्यांनी ह्यावर कोणतंही विधान केलं नाही.

iPhone 15 Pro मध्ये नेव्हिगेटर

Apple च्या नवीनतम iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये इंडियन नेव्हिगेशन प्रणाली NavIC ला सपोर्ट देण्यात आला. ही प्रणाली अमेरिका आणि रशियाच्या ग्लोन्स प्रणालीप्रमाणे काम करते. यासाठी आठ उपग्रह अवकाशात पाठवण्यात आले आहेत, त्यामुळं 1500 किमीपर्यंत नेव्हिगेशन मॅप मिळतो. विशेष म्हणजे Xiaomi, Vivo, Realme, OnePlus, Oppo आणि आयकूचे देखील काही फोन्स नाविक रेडी आहेत.

Tags

follow us