Menopause Report : रात्रंदिवस आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी स्त्री ही नेहमी तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते हे सर्वच घरांमध्ये अगदी सामान्यपणे पाहायला मिळतं. मात्र हेच दुर्लक्ष करणं एका मोठ्या आजाराला निमंत्रण देणं ठरतं एवढं मात्र नक्की. मासिकपाळी, गरोदरपण, बाळंतपण आणि रजोनिवृत्ती म्हणजेच ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो. बरेचदा महिलांना वाटतं मासिकपाळी, गरोदरपण, बाळंतपण झालं आणि आता मासिकपाळीही गेली. आता मेनोपॉजमध्ये शरीरीकडे पहिल्यासारखं लक्ष देण्याची गरज नाही. महिलांच्या आयुष्यातील हाच टप्पा अत्यंत दुर्लक्ष केला जाणारा असतो. त्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होण्याचा धोका जास्त असतो. मात्र मेनोपॉज कोणत्या वयात आले आहेत? त्याचा काय त्रास जाणवत आहे? हे जाणून घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं असतं. यावर एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. हा अहवाल नेमका काय? जाणून घ्या सविस्तर…
अहवाल नेमका काय आहे?
JAMA कार्डियोलॉजी यांच्याकडून ह्यूमन रिप्रोडक्टिव ओपन जर्नल प्रसिद्ध करण्यात आलं. ज्यासाठी नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलं. यामध्ये महिलांचा मेनोपॉज आणि ह्रदयाच्या समस्या याचा आभ्यास करण्यात आला. यासाठी संशोधकांनी 1964 ते 2018 यादरम्यानच्या जवळपास दहा हजार महिलांचा अभ्यास केला. यामधून काही धक्कादायक असे निष्कर्ष समोर आले. ते म्हणजे या अभ्यासामध्ये हे दिसून आलं की ज्या महिलांना चाळीशीच्या आत मेनोपॉज आले आहेत. ज्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपॉज म्हणतो. या महिलांना पुढील आयुष्यामध्ये हृदयाच्या संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका हा 40 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे पूर्वी ही समस्या फक्त एक टक्के महिलांना होती मात्र आता ही समस्या तीन ते चार टक्क्यांवर पोहोचली आहे. म्हणजे प्रत्येक 100 महिलांपैकी तीन ते चार महिला या समस्येचा सामना करत आहेत.
महिलांना चाळीशीच्या आत मेनोपॉज आले तर त्याचा ह्रदयाला धोका काय? पाळी जाणे आणि ह्रदयाचा संबंध काय? तर याचा थेट संबंध हा एस्ट्रोजेन हार्मोनशी आहे. हे हार्मोन महिलांच्या शरीरात नैसर्गिकरित्या त्यांच्या ह्रदयाचं संरक्षण करतं. मात्र जेव्हा मेनोपॉज येतात तेव्हा हे कवच संपतं त्यातही लवकर मेनोपॉज आल्यास ह्रदयाच्या समस्यांचा धोका जास्त वाढतो. तर एस्ट्रोजेन कमी झाल्याने शरीरामध्ये पोटाची चरबी वाढणे, वजन वाढणे, रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा येणे, उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल वाढणे, शरीराचे स्नायू कमजोर होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागतात.
मेनोपॉज लवकर येण्याची कारणं काय?
अनेकदा याचं ठोस कारणं कळत नाही मात्र काही मुख्य कारणं असू शकतात त्यामध्ये अनुवंशिकतेमुळे म्हणजे तुमच्या आई, बहिण आणि आजीची पाळी लवकर गेली असेल तर तुम्हालाही मेनोपॉज लवकर येऊ शकतात. जर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीने तुमच्या अंडाशयावर हल्ला केल्यास, ज्याला आपण ऑटोइम्यून जार म्हणतो. एखाद्या गंभीर इन्फेक्शन किंवा ऑपरेशनमुळे अंडाशयाचं काम बंद झाल्यास, चुकीचं लाईफस्टाईल, व्यसनं
मेनोपॉज लवकर येऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?
आहारामध्ये बदल करा. ज्यामध्ये ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या, बाहेरील जंकफुड टाळावे, दररोज व्यायाम करावा. दररोज कमीत कमी 30 मिनिटं चालावं, जर पाळी लवकर गेली तर नियमित तपासणी करावी. बीपी, कोलेस्ट्रॉल तपासावे. तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
“प्राजक्तराज” आता “प्राजक्तसाज”; मोठी घोषणा करत प्राजक्ता माळीने बदली ज्वेलरी ब्रॅण्डची ओळख
दरम्यान हा अहवाल जरी समोर आला असेल तरी या अभ्यासातून महिलांना घबरवण्याचा उद्देश्य नाही तर जागृती निर्माण करण्याचा हेतू आहे. जेणे करून तुम्ही यातील कोणत्या प्रकारामध्ये मोडता हे तुम्हाला कळाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. त्यामुळे याअहवालाला अर्ली वॉर्निग सिग्नल प्रमाणे पाहिलं जावं असं आवाहन देखील यातून करण्यात आलं आहे.
