व्हॉट्सॲप बिझनेससाठी नवीन नियम! आता मेसेजऐवजी ‘टोकन’नुसार शुल्क; काय बदलणार?

Whatsapp Business Charges नवीन प्रणाली अधिक पारदर्शक असून साध्या प्रश्नांसाठी कमी टोकन्स वापरले जात असल्याने खर्चही कमी होऊ शकतो.

Whatsapp Business

Whatsapp Business

New Rule For Whatsapp Business : व्हॉट्सॲप बिझनेस वापरणाऱ्या कंपन्यांसाठी मेटाने मोठा बदल जाहीर केला आहे. कंपनीने व्हॉट्सॲप बिझनेस एआय (AI Agents) साठी नवीन टोकन-आधारित बिलिंग प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत प्रत्येक मेसेजनुसार शुल्क आकारले जात होते. मात्र, आता एआयसोबत झालेल्या संभाषणात वापरल्या जाणाऱ्या टोकन्सच्या संख्येनुसार पैसे मोजावे लागतील. मेटाच्या म्हणण्यानुसार, ही नवीन प्रणाली अधिक पारदर्शक असून साध्या प्रश्नांसाठी कमी टोकन्स वापरले जात असल्याने व्यवसायांचा खर्चही कमी होऊ शकतो.

नवीन नियम कधीपासून लागू होणार?

मेटाने दिलेल्या माहितीनुसार, आता मेसेजऐवजी ‘टोकन’नुसार शुल्काचा 1 ऑगस्ट 2026 पासून ही नवीन बिलिंग प्रणाली लागू होणार आहे. व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्मवर एआय एजंट्स वापरणाऱ्या सर्व व्यावसायिक खात्यांसाठी हा नियम लागू असेल.

मेसेज नाही, तर टोकन्सनुसार आकारले जाणार शुल्क

यापूर्वी एआय एजंटने पाठवलेल्या प्रत्येक मेसेजसाठी शुल्क आकारले जात होते. मात्र, नवीन प्रणालीमध्ये वापरकर्त्याने प्रश्न विचारल्यापासून एआयने उत्तर देईपर्यंत वापरल्या गेलेल्या टोकन्सच्या संख्येनुसार बिल तयार होईल. त्यामुळे छोट्या आणि साध्या संभाषणांसाठी तुलनेने कमी खर्च येण्याची शक्यता आहे.

किती असेल शुल्क?

मेटाने जगभरासाठी एकसमान दर निश्चित केला आहे. त्यानुसार 10लाख (1 Million) टोकन्ससाठी 2 डॉलर (सुमारे 190 रुपये), एका सामान्य एआय संभाषणात साधारण 20,000 ते 25,000 टोकन्स वापरले जातात. त्यानुसार एका सरासरी एआय संभाषणाचा खर्च सुमारे 4 ते 5 रुपये इतका येऊ शकतो.

व्यवसायांवर काय परिणाम होणार?

या बदलाचा सर्वाधिक परिणाम व्हॉट्सॲप बिझनेसवरील एआय एजंटचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या कंपन्यांवर होणार आहे. पूर्वी प्रत्येक मेसेजसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जात असल्याने छोट्या-छोट्या उत्तरांसाठीही खर्च वाढत होता. मात्र, नवीन टोकन-आधारित प्रणालीमुळे एआयने कमी माहिती प्रक्रिया केल्यास कमी शुल्क लागेल. त्यामुळे लहान किंवा साध्या संवादांसाठी व्यवसायांचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे, तर मोठ्या आणि अधिक जटिल संभाषणांसाठी वापरलेल्या टोकन्सनुसार बिल आकारले जाईल.

Exit mobile version