NIA Bharti 2023: तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि राष्ट्रीय तपास संस्थेत काम करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीअंतर्गत उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील, मुख्य माहिती अधिकारी या पदांच्या एकूण 13 जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावे लागतील. भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबत सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली.
एकूण पदे – 13
पदांचा तपशील –
उप विधी अधिकारी – 4 पदे
वरिष्ठ सार्वजनिक अधिवक्ता – 3 पदे
सरकारी वकील – 5 पदे
मुख्य माहिती अधिकारी – 1 जागा
Photos : रेड कार्पेट ते कॅज्युअल डे आऊटपर्यंत रिताभरीचे फॅशनेबल लूक!
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील – कायद्यातील पदवी.
मुख्य माहिती अधिकारी – बॅचलर पदवी.
पगार –
उप विधी अधिकारी – 56, 100 ते 1,77,500 ५०० रुपये.
वरिष्ठ सरकारी वकील – 67,700 ते 2, 08,700 रुपये.
सरकारी वकील- 78, 800 ते 2, 09, 200 रुपये.
मुख्य माहिती अधिकारी- 1 लाख 23 हजार 100 रुपये ते 2 लाख 15 हजार 900 रुपये.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
अर्ज सादर करण्याचा पत्ता –
एसपी (प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
9 आणि 21 ऑक्टोबर 2023 (पोस्टनुसार)
अधिकृत वेबसाइट – http://www.nia.gov.in